पतीने पत्नीचे कपाट उघडले असता त्यात दिसला एक बॉक्स, त्यात होती एक सुंदर साडी, पत्नीने 10 वर्षांपूर्वी खरेदी केली होती साडी; एका विशिष्ट प्रसंगाला परिधान करण्याची होती पत्नीची इच्छा, पण पतीने ती साडी काढली आणि पत्नीच्या प्रेताजवळ ठेवली

दिव्य मराठी

Apr 12,2019 03:40:00 PM IST

रिलिजन डेस्क। एक पती आपल्या बेडरुममध्ये गेला आणि त्याने आपल्या पत्नीचे कपाट उघडले. त्यात त्याला एक बॉक्स दिसला. बॉक्समध्ये एक सुंदर साडी होती. ही साडी त्याच्या बायकोने 10 वर्षापूर्वी खरेदी केली होती. त्याच्या पत्नीने ही साडी कधीच नेसली नव्हती, कारण तिला ही साडी विशिष्ट प्रसंगी परिधान करायची होती.


10 वर्ष अशीच निघून गेली पण साडी नेसायचा म्हणावा तसा प्रसंग आला नाही. एकेदिवशी पत्नीचे निधन झाले. त्यानंतर पतीने ती साडी बॉक्स मधुन काढली आणि पत्नीच्या अर्थीजवळ ठेवली.


पत्नीच्या प्रेताजवळ रडत त्याने सर्वांना सांगितले की, कोणतीही गोष्ट विशिष्ट प्रसंगासाठी राखून ठेवायची नाही. पती पत्नीच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण खूप चांगला असतो. भविष्यात कधीही काहीही घडू शकते, त्यामुळे आहे तो क्षण उत्साहाने जगला पाहिजे.


प्रसंगाची शिकवण
कुटुंब आणि मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करायला पाहिजे. कामाचा ताण घरात आणू नये. जर एखादी वस्तु खरेदी केली तर ती भविष्यात एखाद्या प्रसंगासाठी राखून ठेऊ नये. संधी मिळेल तेव्हा वस्तूंचा उपभोग घ्यावा. अन्यथा भविष्यात कधी काय होईल याची कोणालाच माहिती नसते.

X