Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | story of 4 blind friends and elephant in marathi

आपण आपले मत अवश्य मांडावे परंतु इतरांचे मतही काळजीपूर्वक ऐकावे

रिलिजन डेस्क | Update - Jan 10, 2019, 12:03 AM IST

एका गावात 4 अंध मित्र राहत होते, गावात एके दिवशी हत्ती आला, चारही मित्रांनी हत्तीला स्पर्श करून त्याच्याविषयी मत मांडले

 • story of 4 blind friends and elephant in marathi

  एका गावात 4 अंध मित्र राहत होते. एके दिवशी कोणीतरी त्यांना गावात हत्ती आल्याचे सांगितले. यापूर्वी त्यांनी हत्तीविषयी फक्त ऐकले होते. चारही मित्रांनी विचार केला की हत्तीला स्पर्श करून पाहावे तरी तो नेमका कसा असतो. चारही मित्र हत्तीजवळ पोहोचले आणि त्याला स्पर्श करू लागले.


  एका मित्राने हत्तीच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला- मला समजले, हत्ती एका खांबाप्रमाणे असतो. दुसऱ्या मित्राने हत्तीचे शेपूट पकडले आणि म्हणाला- अरे नाही, हत्ती तर दोरीप्रमाणे असतो. तिसऱ्या मित्राने हत्तीच्या सोंडेला स्पर्श केला आणि म्हणाला- तुम्ही दोघेही चुकीचे बोलत आहात, हत्ती तर झाडाच्या फांदीप्रमाणे असतो.


  तेवढ्यात चौथ्या मित्राने हत्तीच्या कानांना स्पर्श केला आणि म्हणाला- तुम्ही सर्वजण खोटे बोलत आहात, हत्ती तर एका मोठ्या पंख्यासारखा असतो. अशाप्रकारे चारही मित्र वाद घालून स्वतःचे म्हणणे खरे सिद्ध करण्याच्या मागे लागले. त्यांच्यातील वाद वाढला आणि मोठे भांडण सुरु झाले.


  तेवढ्यात तेथून एक व्यक्ती चालला होता. त्याने या चौघांना भांडताना पाहून याचे कारण विचारले. चौघांनीही एका स्वरात सांगितले की, हत्ती नेमका कसा दिसतो हे आम्हाला निश्चित करता येत नाहीये. आणि नंतर त्यांनी आपापले हत्तीविषयीचे मत त्या व्यक्तीला सांगितले.


  त्या व्यक्तीने चौघांचेही मत जाणून घेतले आणि म्हणाला- तुम्ही सर्वजण आपापल्या मतानुसार बरोबर आहात, कोणीही काही चुकीचे सांगितलेले नाही. फरक एवढाच आहे की, तुम्ही सर्वांनी हत्तीच्या वेगवेगळ्या अंगाला स्पर्श केला आहे. त्या व्यक्तीचे उत्तर एकूण चौघांनाही आनंद झाला की सर्वजण सत्य सांगत होते.


  लाईफ मॅनेजमेंट
  काहीवेळेस आपण एखाद्या गोष्टीवर अडून बसतो की, आपणच बरोबर आहोत आणि बाकीचे सर्व चुकीचे आहेत. परंतु कधीकधी आपल्याकडून चुकही होते की कारण आपल्याला नाण्याची एकच बाजू माहिती असते, दुसरी नाही. यामुळे आपण आपले मत तर मांडावे परंतु इतरांचे मतही ऐकून घेण्याचा मानसिकता ठेवावी.

Trending