आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर अपघात : मृतदेहांमध्ये शोधूनही सापडला नाही 13 वर्षांचा मुलगा, रोज रडत होते आई-वडील, अचानक मिळाली GOOD NEWS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - फूल सिंग यांच्या कुटुंबासाठी हा एक चमत्कारच होता. अमृतसर रेल्वे अपघातात 13 वर्षांचा मुलगा मेल्याचे समजून आई वडील रोज रडत होते. पण अचानक दिल्लीहून कॉल आला. या एका कॉलने दुःखाचे वातावरण आनंदात बदलले. कारण दसऱ्याच्या दिवशी 60 जणांचा जीव घेतलेल्या या रेल्वे अपघातातून फूल सिंह यांचा मुलगा बचावला होता. 


अपघातानंतरही मुलगा अर्शदीप घरी परतला नाही तर फूल सिंह आणि त्यांच्या पत्नीने मनावर दगड ठेवत आपण मुलगा गमावला असे समजले. आता मुलगा परत कधीही येणार नाही असेच त्यांना वाटत होते. त्यांनी मृतदेहांमध्ये मुलाचा शोधही घेतला. पण काहीही हाती लागले नाही. ते वारंवार हॉस्पिटलमध्येही जात होते. पण प्रत्येकवेळी हाती निराशाच लागत होती. त्यांचे कुटुंब राहायलाही जोडा फाटकच्या जवळच होते. 


दरम्यान, मंजू गुप्ता नावाच्या तरुणीने त्यांची मदत करत अर्शदीपचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. दिल्लीमध्ये काम करणाऱ्या एका संस्थेने अर्शदीपचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. दिल्लीमध्ये काम करणाऱ्या साथ नावाच्या एका संस्थेने अर्शदीपचा फोटो पाहिला आणि तो जिवंत असल्याची बातमी दिली. मंगळवारी या कुटुंबाने मुलाला घरी आणले. अर्शदीप म्हणाला की, तो घटनेनंतर प्रचंड घाबरला होता त्याचवेळी तो एका रेल्वेत जाऊन बसला आणि दिल्लीला पोहोचला. 

 

बातम्या आणखी आहेत...