Home | Jeevan Mantra | Dharm | story of a king and sant

साधू दरबारात पोहचताच राजा त्यांना म्हणाला, 'महाराज आमच्या राजकुमाराची किंमत सांगू शकाल', साधूने किती लावली असेल राजकुमाराची किंमत?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 11, 2019, 12:21 AM IST

मनुष्याला स्वत:ची योग्यता ओळखता आली पाहिजे. तेव्हाच त्याला सन्मान मिळेल.

 • story of a king and sant

  प्रेरणादायी गोष्ट- पुर्वीच्या काळी एका राज्यात एक साधू महाराज राहत होते. त्यांचे खास वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वस्तूची अचूक किंमत सांगत होते. त्या राज्यातील राजाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने साधू महाराजांना दरबारात बोलावले. साधू महाराज दरबारात पोहचल्यानंतर राजाने त्यांना म्हणाला की, तुम्ही आमच्या राजकुमाराची किंमत सांगू शकता का ?

  राजाचा हा प्रश्न ऐकून साधू महाराज गोंधळात पडले. परंतू राजाने प्रश्न केल्यामुळे त्यांनी राजाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे ठरवले. राजकुमाराचे निरीक्षण करत साधू महाराज म्हणाले, महाराज मी तुमच्या राजकुमाराची किंमत सांगण्यासाठी तयार आहे. परंतू माझी एक अट आहे. मी तुम्हाला राजकुमाराची किंमत सांगितल्यानंतर तुम्ही क्रोधित होणार नाही असे वचन द्या. राजाने साधू महाराजांची अट मान्य करत त्यांना क्रोध व्यक्त न करण्याचे वचन दिले.

  त्यानंतर साधू महाराज म्हणाले, महाराज तुमच्या राजकुमाराची किंमत दोन आण्यांपेक्षा अधिक नाही. साधू महाराजांचे हे उत्तर ऐकताच राजाला समजले की, जर राजकुमार सर्व साधारण मनुष्यासारखे काम करत असेल तर त्याला कोणीही दोन आण्यांपेक्षा जास्त पैसे देणार नाही.

  गोष्टीची शिकवण-
  या गोष्टीची शिकवण अशी की, मनुष्याला आपली योग्यता ओळखता आली पाहिजे. त्यानंतरच त्याला कुटुंबात, समाजात योग्य मान मिळेल.

Trending