आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Story Of A Mother Sacrifices Herself In Red Light Area For Her 4 Year Old Son Utter Pradesh News

मुलाचं बरवाईट होऊ नये म्हणून आईला दररोज विकावी लागली अब्रू; जिवंतपणी भोगत होती नरकयातना, मन सुन्न करणारी सत्यकथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा (Agra News) - आपल्या मुलासाठी एक आई काहीही करायला तयार होते. असेच काहीशी घटना उत्तर प्रदेशातल्या आग्रामध्ये समोर आली. येथे सेक्स रॅकेटच्या दलालांच्या कैदेत एक आई अडकली. तिच्या 4 वर्षांच्या मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन या माऊलीला देहविक्रयाच्या दलदलीत ढकलण्यात आले होते. अनेकदा तिने आत्महत्येबाबत विचार केला, पण कधी ना कधी मुलाला यातून सुखरूप बाहेर काढण्याच्या अपेक्षेने जिवंत राहिली. ऑपरेशन रेड लाइड एरियाअंतर्गत दोन आठवड्यांपूर्वी सुटका करण्यात आलेल्या या महिलेने गुन्हेगारी जगताचे अतिशय भयंकर रूप सांगितले आहे. 

 

फ्लॅशबॅक
पश्चिम बंगालच्या नॉर्थ 24 परगन्यातील या या महिलेचे 5 महिन्यांपूर्वी पतीशी भांडण झाले होते. वादानंतर ती आपल्या 4 वर्षांच्या मुलाला घेऊन माहेराकडे निघाली. परंतु रेल्वे स्टेशनवरच सेक्स रॅकेटच्या दलालांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले. दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत त्यांनी टोळीतील एका महिलेला तिच्यासोबत बसवले. दिल्लीत पोहोचल्यावर या मायलेकांना रेड लाइट एरियात नेण्यात आले. तेथे जाताच महिलेला लक्षात आले की, आपण अतिशय चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. तेथून तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दलालांनी तिच्या मुलाला ताब्यात घेऊन दुसरीकडे दडवून ठेवले. आणि येथूनच तिच्या भयंकर छळाला सुरुवात झाली.

 

मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन करायचे ब्लॅकमेल
दुसरीकडे, पतीने जेव्हा माहेरच्या मंडळींशी संपर्क केला, तेव्हा ती माहेरी आलेली नसल्याची माहिती मिळाली. मग त्याने पत्नीचा शोध सुरू केला. मुलगा दिल्लीतील दलालांच्या ताब्यात होता. दलालांनी मुलाची धमकी देऊन ब्लॅकमेल करत महिलेला आग्र्यातील छत्तामध्ये असलेल्या एका कुंटणखान्यावर बसवले. 24 तासांत तिला एकदाच आपल्या मुलाशी व्हिडिओ कॉलवरून बोलू द्यायचे. जेणेकरून तिला विश्वास यावा की मुलगा जिवंत आहे.

 

आणि मग ती एक दिवस ओळखीच्या माणसाला दिसली पण...
यादरम्यान, महिलेचा शोध कुटुंबीयांकडून सुरूच होता. नोव्हेंबर 2018 मध्ये तिचा शोध लागला. काश्मिरी बाजार रेड लाइट एरियाच्या गल्ल्यांमध्ये तिच्या कुटुंबाच्या ओळखीचा एक जण तिचा शोध घेत होता. तेवढ्यात एका कोठ्यातून डोकावताना एक महिला त्याला दिसली. मग दलालाच्या माध्यमातून तो कोठ्यावर पोहोचला. महिलेनेही त्याला ओळखले. तरीही ओळख नसल्याचे तिने दाखवली. यानंतर परिचिताने महिलेच्या कुटुंबीयांना ती रेड लाइट एरियात असल्याची माहिती दिली. पीडिता तेथेच असल्याची खात्री पटल्यानंतर कुटुंबीयांनी एसएसपी अमित पाठक यांना मदत मागितली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी सीओ कोतवाल अब्दुल कादिर यांना रेस्क्यू ऑपरेशनची जबाबदारी सोपवण्यात आली.

 

असे चालले ऑपरेशन रेड लाइट एरिया
पोलिसांतीलच काही जण दलालांशी मिळालेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन सीओंनी सर्कलमधील ठाण्यांची एक टीम बनवली, पण त्यांना मिशन काय आहे, हे सांगितले नाही. ठाण्यामध्ये पूर्ण टीम जमा करून त्यांचे मोबाइल जमा करण्यात आले. यानंतर त्यांना ऑपरेशन रेड लाइट एरियाची माहिती देण्यात आली. परंतु, पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे महिलेला सोडवल्यानंतर तिच्या मुलालाही सुखरूप बाहेर काढण्याचे होते. पोलिसांनी तो व्हॉट‌्सअॅप नंबर ट्रॅक केला, ज्या माध्यमातून माय-लेकाला बोलू दिले जात होते. मग दिल्लीत चार-पाच जागांवर छापे टाकून अखेर मुलाला ताब्यात घेण्यात आले.

 

ग्राहक बनून कुंटणखान्यांवर शोध घ्यायचे कुटुंबीय
या ऑपरेशननंतर महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी टीम बनवून कोलकाता, दिल्ली, गाजियाबाद, आग्र्यासहित दहा जिल्ह्यांतील शंभराहून जास्त कुंटणखाने पालथे घातले. तेथे ते ग्राहक बनून जायचे. प्रत्येक जागेवर त्यांना तीनशे ते पाचशे रुपये द्यावे लागायचे. यासाठी त्यांनी भरपूर खर्च केला.

 

 

बातम्या आणखी आहेत...