आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवस पुर्ण झाल्यावर श्रध्दाळू आपली जीभ कापून करतात अर्पण, 101 वर्षात दिड हजारांपेक्षा जास्त महिलांनी केले आहे असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदोर | आंतरीमाता मंदिरामध्ये श्रध्दाळू नवस करतात, नवस पुर्ण झाल्यावर ते स्वतःची जीभ अर्पण करतात. यामध्ये महिला अजिबात मागे नाहीत. प्रत्येक वर्षी 16-17 महिला आपली जीभ कापून देवीला अर्पण करतात. विक्रम संवत् 1327 मध्ये तत्कालीन रामपुरा स्टेटचे राव सेवा-खीमाजी व्दारे या मंदिराची निर्मिती करण्यात आली. इतिहासक डॉ. पूरण सहगलने 'चारण की बेटी' पुस्तकामध्ये लिहिले आहे की, आंतरीचे मंदिर जवळपास 700 वर्षे जुने आहे. जगत जननी जगदंबा दक्षिण दिशेने नदीच्या हनुमान घाट मंदिरातून येऊन विराजमान झाली आहे. 


आजही दगडावर आहे आईच्या वाहनाचे पदचिन्ह 
आजही हनुमान घाटाच्या दगडावर आईच्या वाहनाचे पदचिन्ह आहे. येथे पुजा-अर्चना केली जाते. तर दूसरे पदचिन्ह मंदिरावर आहे. देवी स्वतः प्रतिष्ठित झाली आहे. देवीला भैंसावरी माताच्या नावाने ओळखले जाते. गर्भगृहामध्ये डाव्या बाजूला दुर्गामाताची मुर्ती आहे. श्रध्दाळू मंदिरात दर्शनासाठी येतात आणि नवस करतात. नवस पुर्ण झाल्यावर श्रध्दाळू जीभ कापून अर्पण करतात. ही परंपरा जवळपास 700 वर्षांपासून सुरु आहे. 

 

मंदिरात 700 वर्षांपासून सुरु आहे परंपरा 
प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये श्रध्दाळू मंदिरात येतात. 4-5 श्रध्दाळू रोज जीभ अर्पण करतात. नवरात्रीमध्ये सामान्यतः जवळपास 50-55 लोक आपली जीभ देवीला अर्पण करतात. वर्षभरात आकडा 100 ते 125 पर्यंत पोहोचतो. मंदिर प्रबंधनानुसार जवळपास 101 वर्षात जवळपास 12625 श्रध्दाळूंनी (1616 महिलांचाही समावेश) जीभ अर्पण केली आहे. मंदिराचे पुजारी भारतसिंह सांगतात की, जीभ अर्पण केल्यानंतर श्रध्दाळु नऊ दिवस मंदिर परिसरात राहून देवीचे दर्शन करतात. नऊ दिवसात कापलेली जीभ परत येते आणि श्रध्दाळू घरी परततात. प्रत्येक वर्षी हा क्रम सुरु असतो. या वेळी शारदीय नवरात्र सुरु होण्याच्या एक दिवसपुर्वी मंगळवारी श्रध्दाळू पवनसिंह पिता नागूसिंह महागढ आणि गोपाल पिता रामेश्वर भाटी केलूखेडाने जीभ अर्पण केली. 

बातम्या आणखी आहेत...