आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोएडात बसून अमेरिका आणि कॅनडातील लोकांना लावला कोट्यावधींचा चुना, माइक्रोसॉफ्टचे इंजिनियर बनून लोकांना अडकवायचे जाळ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नोएडा- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासह 12 पेक्षा जास्त देशात माइक्रोसॉफ्ट विंडो यूज लोकांच्या सीस्टीमवर खोटे पॉप-अप मेसेज पाठवून चोरी करणाऱ्या गँगचा भंडाफोड झाला आहे. वेगवेगळ्या सायबर गँगच्या 27 आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे. हे सायबर चोर कॉप्यूटर स्क्रीनवर माइक्रोसॉफ्ट वॉर्निंग अलर्ट किंवा विंडो वायरस अटॅक किंवा इतर अनेक प्रकारचे अलर्ट मेसेज पाठवून माइक्रोसॉफ्ट टेक सपोर्टच्या नावाने लोकांना लुटायचे.


नोएडात 9 ठिकानी छापेमारी, 27 अटक

- या प्रकरणात माइक्रोसॉफ्ट कंपनीकडून नोएडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात सांगितले की, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये अनेक ठिकाणी खोटे कॉल सेंटर चालवले जात आहेत, त्यामाध्यमातून विदेशी नागरिकांकडून रोज लाखों रूपये लुटले जात आहेत.

 

- एसएसपी डॉ. अजयपाल यांनी सांगितले की, पोलिसांच्या 8 टीमच्या 50 पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणा छापेमारी करून 27 आरोपीना अटक केली आहे. आरोपींमध्ये बीबीए, एमबीए आणि बीटेक झालेले विद्यार्थी आहेत.


असा झाला भंडाफोड

- हे सायबर गुन्हे करण्यासाठी माइक्रोसॉफ्टच्या खोट्या लोकांचा उपयोग व्यायचा. हेल्पलाइन नंबरसाठी अमेरिकेच्या व्हर्च्युअल नंबरला जनरेट करायचे. आणि लोकांना फसवायचे.

 

- पेमेंटसाठी कोणी तयार झल्यावर पे-पाल किंवा दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे मागायचे. जेव्हा पाठवलेल्या पॉप-अपच्या आयपीचा तपास केला तेव्हा कळाले की,  डोमेन आणि सर्वर भारतातील आहे. या आधारावर माइक्रोसॉफ्ट, एफबीआई आणि कॅनडा पोलिसांच्या मदतिने आरोपीपर्यंत पोहोचता आले. 

 

बातम्या आणखी आहेत...