आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत जाते सांगून मैत्रिणीच्या घरी जायची 14 वर्षीय मुलगी, अचानक झालेले शारिरीक बदल पाहून आई झाली हैराण, डॉक्टरांनी कारण सांगितल्यावर बेशुद्ध पडली आई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बठिंडा(पंजाब)- बठिंडाच्या एका खासगी शाळेत 8वीत शिकत असलेली मुलगी आम्लीपदार्थांच्या आहारी गेली आहे. रामां मंडी परिसरात राहणाऱ्या मुलीची त्याच परिसरातील श्रीमंत मुलींसोबत झालेली मैत्री तिला व्यसनाकडे घेऊन गेली. एके दिवशी मुलींनी तिला एक पांढरे पाउडर सारखे दिसणारा पदार्थ दाखवला आणि मैत्रीची शप्पत देऊन तिला तो ओढायला लावला. त्यानंतर हळू-हळू तिला त्याची सवय पडली. पंजाबच्या महाविद्यालयात विकल्या जाणाऱ्या या अम्लिपदार्थांची विक्री आता शाळेतही होत आहे. 


गावातील मुले विकतात व्यसन
रूग्णालयात भर्ती असलेल्या मुलीने सांगितल की, तिच्या गावातील काही युवक हे आम्ली पदार्थ विकतात. त्या युवकांना ती ओळखत नसल्याचे ती म्हणाली, पण तिच्या मैत्रिणींकडे हे पदार्थ असतात असे तिने सांगितले.


मुलीला सोडायचे आहे व्यसन 
मुलीला आता पश्चाताप होत आहे की, वाईट संगतीत लागून तीदेखील व्यसनाच्या आहारी गेली आहे. पण तिला आता व्यसन सोडायचे आहे आणि सामान्य मुलींप्रमाणे आयुष्य जगायचे आहे. तिने तिच्या मैत्रिणींनादेखील की, व्यसन सोडून देण्याची अपील केली आहे. 


आईने केली होती पोलिसात तक्रार 
मुलीच्या आईने तक्रार दिली होती की, तिची मुलगी ड्रग अॅडिक्ट आहे आणि एक मुलगा तिला आम्लीपदार्थ देण्यासाठी आला होता. प्रकरण कळताच आम्ही मुलीला रूग्णालयात भर्ती केले आहे. मुलगी साक्ष देण्याच्या परिस्थितीत आल्यावर तिच्याकडून आम्ली पदार्थांची विक्री करणाऱ्या युवकांची नावे जाणून त्यांना ताब्यात घेण्यात येईल.
- एस.आय. सुखवीर कौर, एस.एच.ओ. रामा मंडी