आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनामध्ये मृत्यू किंवा त्याच्याशी संबंधित विचार आल्यास एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्य आणि आयुष्याशी संबंधित विषयांच्या बाबतीत गौतम बुद्धांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि लगेच आत्मसात करता येईल असा आहे. त्यांनी कधीच कोणताच विषय फार अवघड करून समजावून सांगितला नाही. आपल्या शिष्यांच्या जीवनातील सर्व जिज्ञासांचे उत्तर ते सामान्य उदाहरणांमधून देत होते.


एकदा गौतम बुद्धांच्या एका शिष्याने त्यांना विचारले, गुरुदेव, तुम्ही आजपर्यंत हे नाही सांगितले की मृत्यूनंतर काय होते. शिष्याचा प्रश्न एकूण बुद्धांनी स्मित हास्य केले आणि शिष्याला म्हणाले, पहिले माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. एखादा व्यक्ती रस्त्यावरून जात असताना अचानक त्याच्या शरीरात विषारी बाण येऊन घुसला तर त्या व्यक्तीने काय करावे? पहिले शरीरात घुसलेला बाण काढावा की बाण कोणत्या दिशेने आला आणि कोणाला लक्ष्य करण्यासाठी सोडला गेला आहे हे पाहावे?


शिष्य म्हणाला, पहिले शरीरात घुसलेला बाण लगेच काढावा नाही तर विष संपूर्ण शरीरात पसरू शकते. गौतम बुद्ध म्हणाले, एकदम बरोबर सांगितले तू. आता हे सांग पहिले जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत की मृत्यूनंतर काय होणार याचा विचार करावा. जे आपल्या वशमध्ये नाही त्याचा विचार का करावा. कोणाचा मृत्यू केव्हा होणार हे फक्त परमात्मा जाणतो. मनुष्याच्या हातामध्ये केवळ कर्म करणे आहे. मनुष्याने आपल्या हातामध्ये असलेल्या विषयांचा विचार करावा इतर विषयांचा विचार करून वेळ वाया घालवू नये. ज्या गोष्टी आपण करून शकतो त्याच गोष्टींचा विचार करावा. गौतम बुद्धांचे हे उत्तर ऐकून शिष्याचे मन शांत झाले.


कथेची शिकवण (Moral of Story)
मनुष्याने त्याच्या हातामध्ये नसलेल्या गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. स्वतःच्या अडचणी कशाप्रकारे कमी करता येतील या गोष्टीनीचा जास्त विचार करावा, समाजाचा कसा फायदा होईल किंवा एखाद्याला आपल्याकडून कशाप्रकारे मदत होईल असा विचार करावा.

बातम्या आणखी आहेत...