आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कंजूसाला मृत्यूनंतर नरकात पाठवण्यात आले; देवाकडे दयायाचना केल्यानंतर देवाने त्याला स्वर्गात पोहचण्याची शिडी दिली, तो जसा शिडीवर चढू लागला तेव्हा इतरही वर चढू लागले, हे पाहून त्याने केले असे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेरणादायी गोष्ट- एका गावात एक कंजूस कंजूस राहत होता. त्याने आपल्या आयुष्यात कधीच कोणाची मदत केली नाही. गरीबांना दान केले नाही. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याला नरकात जागा मिळाली. त्यानंतर नरकात त्याची खूपच दयनीय अवस्था झाली. 

 

त्याला नरकात अतिशय खालच्या दर्जाची वागणूक मिळाल्यानंतर तो देवाकडे इथून बाहेर पडण्याची प्रार्थना करु लागला. एके दिवशी देवाला त्याच्यावर दया आली. देवाने चित्रगुप्ताला त्याच्या कुंडलीविषयी विचारले. देव म्हणाला, चित्रगुप्त या कंजूसने त्याच्या आयुष्यात कधी चांगले काम केले आहे का? जेणेकरुन त्या पुण्याफळातून याला स्वर्गात पाठवता येऊ शकते. तेव्हा चित्रगुप्ताने देवाला सांगितले, या कंजूसने एकदा भिकाऱ्याला सडलेले केळ दिले होते. हे ऐकल्यानंतर देवाने त्याला नरकातून बाहेर काढण्यासाठी उपाय शोधला. देवाने त्याच्याकडे एक शिडी पाठवत त्याला सांगितले की, या शिडीच्या माध्यमातून तु नरकातून बाहेर येऊ शकतो. देवाने नरकात शिडी पाठवल्यानंतर हा कंजूस खूश झाला. त्याने तातडीने शिडीवर चढायला सुरुवात केली. परंतू त्याच्यासोबत नरकातील इतरांनीही शिडी चढायला सुरुवात केली. ते पाहून हा कंजूस इतरांना ओरडत म्हणाला की, देवाने ही शिडी माझ्यासाठी पाठवली आहे. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करु शकत नाही. कंजूसने हे शब्द उच्चारताच देवाने पाठवलेली शिडी गायब झाली. आणि तो कंजूस पुन्हा नरकात पडला. तेव्हा एक आवाज आला, 'जर तु दुसऱ्याची मदत नाही करु शकत तर तुझी जागा या नरकातच आहे.'

 

लाइफ मॅनेजमेंट
तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही दुसऱ्यांना देण्याचा विचार करतात. जर तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले केले असेल तर तुमच्यासोबतदेखील चांगलेच होईल. वरील प्रसंगाप्रमाणे कंजूस नेहमी स्वत:चाच विचार करतात. त्यामुळे त्यांच्या वाईट काळात कोणीच त्यांची मदत करत नाही. त्यामुळेच मनुष्याने नेहमी दुसऱ्यांची मदत करायला हवी.

 

 

बातम्या आणखी आहेत...