Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Story of guru disciple, story for sharing, story for kids, story with learning, story with mora

मरण्यापुर्वी एका संताने सर्व शिष्यांना आपल्याजवळ बोलावले आणि विचारले की- पाहा माझ्या तोंडात जीभ आहे की नाही, सर्व शिष्यांनी हो उत्तर दिले, यानंतर संताने विचारले - माझ्या तोंडात दात आहे की नाही, तेव्हा शिष्यांनी काय उत्तर दिले?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 12:00 AM IST

कठोर व्यवहार करणा-यांसोबत कुणीही बोलत नाही, मधुर व्यवहार करणा-याचे सर्वच मित्र असतात 

 • Story of guru disciple, story for sharing, story for kids, story with learning, story with mora

  रिलिजन डेस्क. एका शहरात एक संत राहायचे. त्यांचे अनेक शिष्य होते. ते धर्म आणि ज्ञानाच्या गोष्टी खुप सोप्या पध्दतीने लोकांना समजवायचे. यामुळे लोक त्यांना खुप मानायचे. लोक लांबून लांबून त्यांचे प्रवचन ऐकायला यायचे. बोलता बोलता ते लोकांच्या समस्यांचे समधानही करायचे. एकदा ते खुप आजारी पडले. मृत्यू जवळ आला आहे हे पाहून त्यांनी सर्व शिष्यांना आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले की- आता माझे आयुष्य संपत आले आहे, पण मरण्यापुर्वी तुम्हाला एक अंतिम संदेश द्यायचा आहे. सर्व शिष्य त्यांचे बोलणे लक्षपुर्वक ऐकतात. तेव्हा ते आपल्या शिष्यांना म्हणाले की, माझ्या तोंडात बघा- जीभ आहे की नाही?

  एका शिष्याने पाहिले आणि म्हणाला - गुरुदेव, जीभ तर आहे. यानंतर त्यांनी एका शिष्याला संकेत करत दूसरा प्रश्न विचारला - पाहा, माझ्या तोंडात दात आहेत की नाही? त्या शिष्याने उत्तर दिले - गुरुदेव, तुमच्या तोंडात एकही दात नाही. संताने शिष्यांना विचारले - पहिले दाताचा जन्म झाला की, जीभेचा झाला? शिष्यांनी एकाच वेळी उत्तर दिले की, - जीभेचा जन्म झाला.
  संतांनी पुन्हा शिष्यांना विचारले - जीभ तर वयाने दातांपेक्षा मोठी आहे, पण ती अजूनही आहे पण दात जीभेपेक्षा वयाने लहान असूनही नष्ट झाले, असे का? हा प्रश्न ऐकून सर्व शिष्य एकमेकांची तोंड पाहू लागले. कुणालाच उत्तर देता आले नाही.


  तेव्हा गुरुदेवांनी त्यांना समजावून सांगितले की, - जीभ सरल आणि कोमल आहे, यामुळे ती अजूनही आहे. दात क्रूर आणि कठोर होते आणि यामुळेच ते लवकर नष्ट झाले. तुम्ही जीभेप्रमाणे सरल आणि कोमल बना, दाताप्रमाणे कठोर बनू नका. शिष्यांना अंतिम संदेश देऊन संताने आपले डोळे नेहमीसाठी मिटून घेतले.

  लाइफ मॅनेजमेंट
  काही लोकांचे वागणे खुप कठोर असते. ते छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावतात आणि विचार न करता बोलतात. या वागण्यामुळे काय परिणाम होईल याचाही विचार ते करत नाहीत. अशा लोकांसोबत बोलायला कुणालाही आवडत नाही. तर जे लोक सर्वांसोबत मिळून-मिसळून राहतात, ते सर्वांचे प्रिय असतात.


Trending