आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइफमध्ये प्रॅक्टिकल असाल तरच तुम्ही अडचणींवर मात करू शकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन मित्र आपल्या गुरूंकडून दिशा घेऊन घरी निघाले होते. गुरूने त्यांना अध्यात्मिक तसेच व्यावहारिक ज्ञानाचे शिक्षण दिले होते. तिन्ही मित्र रस्त्यामध्ये ग्रंथ आणि पुराणांची चर्चा करत आपल्या घराकडे निघाले होते.


संध्याकाळ झाल्यानंतर मित्रांनी एका ठिकाणी थांबून आराम करण्याचा विचार केला. तिन्ही मित्र एका ठिकाणी थांबले आणि जेवणाची शिदोरी उघडली. त्यामध्ये फक्त एकच पोळी शिल्लक होती. तिघांनीही विचार केला की, एक पोळी वाटून खाल्ल्यास कोणाचेही पोट भरणार नाही.


यापेक्षा आपल्यापैकी एकानेच ही पोळी खावी म्हणजे त्याचेतरी पोट भरेल. परंतु तो 1 कोण असेल हे कसे निश्चित करायचे? तिघांनाही याचा निर्णय देवावर सोडण्याचे ठरवले. देवच असा काही संकेत देतील ज्यामुळे आपल्यापैकी पोळी कोण खाणार हे समजेल.


असा विचार करून तिघेही झोपले. चालून-चालून थकल्यामुळे लवकर त्यांचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर एक मित्र म्हणाला- रात्री माझ्या स्वप्नात देवदूत आले आणि मला स्वर्गात घेऊन गेले. मला म्हणाले- मुला ही पोळी घे आणि प्रसाद समजून स्वतःची भूक दूर कर.


पहिल्या शिष्याचे बोलणे पूर्ण होताच, दुसरा म्हणाला- किती आश्चर्याची गोष्ट आहे, मीपण असेच स्वप्न पाहिले आणि शेवटी महात्माने मला स्पष्ट निर्देश दिले की, मी आयुष्यभर लोकांचे भले केले आहे यामुळे या पोळीवर माझाच हक्क बनतो.


या दोघांचेही बोलणे चालू होते पण तिसरा शिष्य शांत बसलेला होता. पहिल्या शिष्याने विचारले- तू स्वप्नात काय पाहिले? तिसरा शिष्य म्हणाला- माझ्या स्वप्नामध्ये काहीच नव्हते, मी कुठे गेलोही नाही आणि मला महात्माही दिसले नाही परंतु रात्री माझी झोपमोड झाल्यानंतर मी उठून पोळी खाऊन टाकली.


दोन्ही शिष्य रागाने त्याला म्हणाले- अरे तू हे काय केलेस, हे करण्यापूर्वी तू आम्हला सांगितले का नाहीस? तिसरा शिष्य म्हणाला- कसे सांगणार, तुम्ही दोघेही आपापल्या स्वप्नांमध्ये एवढे दूर निघून गेला होतात आणि कालच गुरुजीने आपल्याला सांगितले होते की अध्यात्मिक ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व समजून घ्या. माझ्या बाबतीत देवाने मला संकेत दिला की उपाशी मरण्यापेक्षा पोळी खाणे उत्तम आहे आणि मी तेच केले.


लाईफ मॅनेजमेंट 
जीवनात छोट्या-छोट्या अडचणी येताच राहतात. प्रत्येक समस्येवर मोठा उपाय शोधावा असे बंधन नाही. प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक पद्धतीनेसुद्धा समस्यांचे समाधान केले जाऊ शकते.