आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाने जलसमाधीसाठी विहिरीत उडी मारली आणि बाहेर निघून म्हणाला ईश्वराच्या आदेशाने स्त्री रूपात व्यतीत करणार जीवन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली (राजस्थान) - एका 20 वर्षीय मुलाने एक नाटकीय घटनाक्रमानंतर स्वतः अचानक मुलगी झाल्याचा दावा केला आहे. परंतु हा मुलगा आणि की मुलगी याविषयी मेडिकल पुष्टी आणखी झालेली नाही. असे का घडले याचा खुलासाही मेडिकल टेस्टनंतर होईल. परंतु गावातील काही महिलांनी दावा केला आहे की त्याचे जननांग आणि इतर अंग महिलांप्रमाणे आहेत. या घटनेनंतर त्याच्या घराबाहेर पूजा-अर्चना आणि जागरण सुरु झाले आहे. अचानक मुलापासून मुलगी बनलेला तरुण भिखाराम आता स्वतःला साध्वी माया सांगत आहे. भिखाराम बंगळुरूमध्ये काम करतो. 16 सप्टेंबरला तो गावाकडे आला. या दिवशी त्याने कुटुंबीय आणि मित्रांना जलसमाधी घेणार असल्याचा मॅसेज सोडून निघून गेला. भिखारामने गावाजवळील विहिरीत उडी मारल्याचा दावा केला. त्यानंतर शुद्धीत आल्यानंतर तो विहिरीच्या बाहेर पडलेल्या अवस्थेत पूर्णपणे स्त्रीमध्ये रूपांतरित झालेला होता.


हे प्रकरण डॉक्टरांकडे, आज मेडिकल बोर्ड तपासणी करण्याची शक्यता
हे प्रकरण जेवढे नाटकीय आहे तेवढेच अंधश्रद्धेलाही खतपाणी घालत आहे. मेडिकल सायन्ससाठी याचा शोध लावणेही तेवढेच आवश्यक आहे. शक्यतो बुधवारी मेडिकल कॉलेजशी संबंधित बागड हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची टीम या मुलाची तपासणी करतील.


असा आहे संपूर्ण घटनाक्रम - भिखारामची कथा संशयास्पद आहे : त्याने सांगितले की- विहिरीत उडी मारली, शुद्धीवर आलो तर बाहेर पडलेलो होतो, स्त्री झाला होतो...
राजपुरा गाव निवासी 20 वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी बंगळुरूवरून आला होता. परत येताच कुटुंबीय आणि मित्रांना जलसमाधी घेणार असल्याचा मॅसेज देऊन घराबाहेर पडला. मंगळवार सकाळी अचानक आला. सांगितले की, विहिरीत उडी मारली, शुद्धीवर आलो तर विहिरीबाहेर पडलेलो आणि स्त्री झालो होतो. हे सांगून त्याने महिलांना कपडे मागितले आणि परिधान केले.


घर सोडण्यापूर्वी मॅसेजमध्ये लिहली होते - मी भगवान भोलेनाथला विचारणार आहे की त्यांनी माझ्यासोबत असे का केले?
तरुणाने जलसमाधी घेण्याच्या नावावर घर सोडण्यापूर्वी सांगितले होते की, जागरणचा कार्यक्रम स्थगित करू नये. मी संपूर्ण शुद्धीमध्ये हे पाऊल उचलत आहे. माझ्या जलसामधीला आत्महत्येचे नाव देऊ नये. मी भोलेनाथला विचारणार, फक्त माझ्यासोबत असे का केले?


भिखाराम म्हणाला - आता परमेश्वराच्या आदेशाने मी स्त्री रूपात जीवन व्यतीत करणार...
स्वतःचे नाव साध्वी माया ठेवले आणि मातीचे शिवलिंग बनवून पूजा सुरु केली. परमेश्वराच्या आदेशाने मी स्त्री रूपात जीवन व्यतीत करणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...