Home | Jeevan Mantra | Dharm | Story Of Jharkhandi Mahadev Temple

या शिव मंदिरात पूजाही होते आणि नमाजही वाचली जाते, मुघल बादशहाने शिवलिंग तोडण्याचा केला होता प्रयत्न

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 10:43 AM IST

भारतातील एका शिव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक होतो आणि यासोबतच येथे मुस्लिम लोक नमाज अदा करतात.

 • Story Of Jharkhandi Mahadev Temple

  शिव मंदिर हिंदूंच्या आस्थेचे प्रमुख केंद्र मानले जातात. जगभरातील सर्व हिंदू पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने महादेवाची पूजा करतात परंतु तुम्ही हे ऐकले आहे का, एखाद्या शिव मंदिरात मुस्लिमसुद्धा नमाज अदा करतात. भारतातील एका शिव मंदिरात शिवलिंगाचा जलाभिषेक होतो आणि यासोबतच येथे मुस्लिम लोक नमाज अदा करतात.


  उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यापासून काही अंतरावर तिवारी एक गाव आहे. या गावामध्ये महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे. याला झारखंडी महादेव असेही म्हणतात. हे मंदिर अत्यंत खास आणि अनोखे मानले जाते.


  शिव मंदिरात कशामुळे होते नमाज
  या संदर्भातील कथा महमूद गजनवीशी संबंधित आहे. कथेनुसार, या शिवलिंगाचा महिमा आणि प्रसिद्धी ऐकून मेहमूद गजनवीने हे शिवलिंग तोडण्याचा खूप प्रयत्न केला. आपली पूर्ण शक्ती पणाला लावूनही त्याला हे शिवलिंग तोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना शिवलिंगावर कुराणमधील एक कलमा लिहिला. यामुळे शिवलिंगाची प्रसिद्धी कमी होईल आणि हिंदू लोक पूजा करणार नाहीत असे त्याला वाटले. मेहमूदने कलमा लिहिल्यानंतर या शिवलिंगाची प्रसिद्धी आणखीनच वाढली आणि येथे हिंदू लोकांसोबत मुस्लीम लोकांचीही गर्दी वाढू लागली. हे दोन्ही धर्माच्या लोकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान बनले.


  शिव मंदिरावर छत नाही
  या शिव मंदिरावर अनेकवेळा छत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु कोणीही हे काम यशस्वीपणे पूर्ण करू शकले नाही. यामुळे मंदिरात शिवलिंग आकाशाखाली स्थापित आहे.


  स्वयंभू मानले जाते हे शिवलिंग
  या शिव मंदिराशी संबंधित एका मान्यतेनुसार, या मंदिरातील शिवलिंग कोणत्याही मनुष्याने स्थापित केलेले नसून आपोआप प्रकट झाले आहे. स्वतः प्रकट झाल्यामुळे हे शिवलिंग खास आणि चमत्कारी मानले जाते.

 • Story Of Jharkhandi Mahadev Temple
 • Story Of Jharkhandi Mahadev Temple

Trending