पती-पत्नी खूप आनंदी होते, पती रोज एक सुवर्ण मुद्रा कमवत होता, एकेदिवशी त्याला यक्ष भेटला, त्याने सांगितले की तुझ्या घरात सोन्याच्या नाण्याने भरलेले सात हंडे ठेवतो, व्यक्ती आनंदीत झाला, घरी गेल्यानंतर पत्नीला घडलेली सर्व गोष्ट सांगितली

दिव्य मराठी वेब टीम

Apr 14,2019 12:00:00 AM IST

रिलिजन डेस्क - पुरातन काळातील लोककथेनुसार एका गावात पती-पत्नी सुखी जीवन जगत होते. पती दिवसभर राजाच्या महालात मेहनत करून एक सुवर्ण मुद्रा कमवत होता. तो व्यक्ती खुप ईमानदार होता, यामुळे तो राजाचा आवडता होता. त्याची पत्नी मोठ्या कुशलतेने घर संभाळत होती.


> एकेदिवशी महालातून घरी परतत असताना वाटेत त्याला एक यक्ष भेटला. यक्ष त्या व्यक्तीला म्हणाला की, मी तुझी ईमानदारी आणि मेहनतीवर खूप खुश आहे. यामुळे मी तुला सोन्याने भरलेले सात हंडे देत आहे. तुला ते हंडे तुझ्या घरी मिळतील. हे ऐकून व्यक्ती खूप आनंदीत झाला.


> घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार पत्नीला सांगितला. खोलीत जाऊन बघितले असता तेथे सात हंडे दिसले. त्यातील 6 हंडे सोन्याच्या नाण्यांनी पूर्णपणे भरलेले होते. पण एक हंडा मात्र अर्धा रिकामा होता. सातवा हंडा बघितल्यानंतर पती-पत्नीला राग आला. त्यांना वाटले की यक्षाने आपली फसवणूक केली. पती रागाच्या भरात यक्ष भेटलेल्या ठिकाणी गेला. तेथे यक्ष प्रगटला आणि म्हणाला की, तो सातवा हंडा तुला स्वतःच्या कमाईने भरावा लागणार आहे.

> यक्षाने सांगितल्याप्रमाणे व्यक्ती स्वतःच्या कमाईने हंडा भरण्यासाठी घरी परतला. त्याने विचार केला की, माझ्याकडे तर इतर 6 हंडे पूर्ण भरलेले आहेत तर मग हा 7 वा हंडा काही दिवसांतच भरेल. घरी आल्यानंतर तो पत्नीला म्हणाला की, सातवा हंडा आपण स्वतः भरू.


> दुसऱ्या दिवसापासून पती-पत्नीने बचत करण्यास सुरुवात केली आणि रिकामा हंड्यात सोन्याचे नाणे टाकणे सुरू केले. अनेक दिवसांनंतरही सातवा हंडा भरला नाही. हळूहळू पती खूप कंजूस झाला, त्याला रिकामा हंडा लवकरात लवकर भरायचा होता. पण अशाने त्याच्या घरात पैशांची कमतरता येऊ लागली.

> त्याच्या पत्नीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. काहीच दिवसांतच घरातील शांती भंग झाली. प्रत्येक गोष्टीवर वाद होत होते. सुखाचे दिवस दुःखात बदलले. व्यक्तीच्या घरी पैशांची कमतरता आलीये हे माहीत झाल्यानंतर राजाने त्याला रोज दोन सुवर्ण मुद्रा देण्यास सुरुवात केली. पण यानंतरही व्यक्तीची सुख-शांती परतली नाही.


> एकेदिवशी राजाने सेवकाला विचारले की, तुला एखाद्या यक्षाने सात हंडे दिलेत का? सेवकाने यावर होकार दिला आणि घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला.

> राजा सेवकाला म्हणाला, 'तू आताच सातही हंडे यक्षाला परत कर. कारण सातवा हंडा लोभाचा आहे. तो कधीच भरणार नाही. लोभाची भूक कधीच शांत होत नसते.' सेवकाला राजाने म्हणणे पटले आणि त्याने सातही हंडे यक्षाला परत केले. यानंतर पुन्हा एकदा पती-पत्नीचे जीवन आनंदमय झाले.


गोष्टीची शिकवण

या कथेची शिकवण अशी आहे की, लोभ एक वाईट गोष्ट आहे ज्यामुळे कोणाचेही जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात लोभाचा प्रवेश झाल्यास पती-पत्नी मधील प्रेण आणि सुख-शांती संपते. यामुळे या लोभापासून आपण सावध रहायला हवे.

X
COMMENT