Home | National | Other State | Story of kumbh mela 2019 Prayagraj kumbh

कुंभ 2019: यावेळेस 45 Km परिसरात पसरला आहे कुंभ मेळा, पहिल्यांदाच 15 लाख वर्ग फूटामध्ये भिंतींना करण्यात आला कलर, मेळ्यात हे असेल खास आकर्षण...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:04 AM IST

पहिल्यांदा 450 वर्षानंतर अक्षयवटचे दर्शन करू शकतील भावीक.

 • Story of kumbh mela 2019 Prayagraj kumbh

  प्रयागराज(उत्तर प्रदेश)- कुंभ मेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाला तीन दिवस बाकी आहेत. त्याआधीच कुंभ नगरी प्रयागराज देश-विदेशातील भावीक आणि पर्यटकांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे. कल्पवासी संगमांवर पोहचणे सुरू झाले आहेत, त्यांनी गंगा-यमुनाच्या संगमवर राहण्यासाठी टेंट लावले आहेत. यावेळेस कुंभ मेळा 45 किलोमीटरच्या परिसरात पसरला आहे, या पूर्वी हा 20 किलोमीटरच्या परिसरात पसरलेला असतो.


  गुरूवारी यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ कुंभ मेळ्याची पाहणी करण्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. तेथे त्यांनी संगमच्या किनाऱ्यावर अकबराच्या किल्ल्यात असलेल्या अक्षयवटला भावीकांच्या दर्शनासाठी उघडले. 450 वर्षांत पहिल्यांदाच अक्षयवट आणि सरस्वती कूपला भावीकांसाठी उघडण्यात आले.


  योगी म्हणाले- 450 वर्षांपासून ही भावना मनात दडलेली होती, त्याना नवीन चेतना मिळेल
  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अक्षयवटची पूजा-अर्चना केली. त्यांनी खुसरोबागचेही लोकार्पण केले. 450 वर्षांपासून ही भावना मनात दडलेली होती, त्याना नवीन चेतना मिळेल. यावेळेस मागच्या 50 वर्षातील सगळ्यात चांगला जल संगम आहे.

  मेळ्यात रोज 500 पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम
  - कुंभ मेळ्याला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.
  - शहरात 15 फ्लायओव्हर-अंडरब्रिज, 264 रस्त्यांचे चौपदरीकरण आणि 22 पान्टून ब्रीज बनवले आहेत.
  - मेळ्यात 1.22 लाख बायो टॉयलेट, 1300 हेक्टेयरमध्ये 94 पार्कीग आणि 20 हजार डस्टबिनची सुविधा आहे.
  - शटल बस सेवा आणि ई-रिक्शादेखील चालु असले. मेळ्यात वेगवेगळ्या बँकांचे 40 एटीएम असतील.
  - 10 हजार भावीकांसाठी टेंटची सुविधा.
  - मेळ्यात रोज 500 सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

Trending