आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ठिकाणी महादेवांनी उघडला होता तिसरा डोळा, आजही कुंडातून निघते उकळते पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये विविध देव-देवतांचे पूजन केले जाते. परंतु या सर्वांमध्ये देवांचे देव महादेव सर्वश्रेष्ठ मानले जातात. भगवान शिव कधी संहारक तर कधी पालकही होतात. भोलेनाथाचा स्वभाव अत्यंत शांत आहे परंतु क्रोधीत झाल्यानंतर तिसरा डोळा उघडतात. त्यांनी तिसरा डोळ्या उघडल्यास सृष्टीवर हाहाकार उडतो. परंतु आता प्रश्न असा आहे की, महादेवांनी कधी तिसरा डोळा उघडला होता का? उघडला असेल तर केव्हा आणि कुठे? आज आम्ही तुम्हाला अशाच ठिकाणाची माहिती सांगत आहोत, जेथे महादेवांनी आपले तिसरे नेत्र उघडले होते. 


हिमाचल प्रदेशात मणिकर्ण ठिकाणी महादेवांनी तिसरा डोळा उघडला होता. महादेवांनी असे करण्यामागे एक कथा सांगण्यात येते. या कथेनुसार एकदा देवी पार्वतीच्या कानातील दागिना क्रीडा करताना पाण्यात पडला. वाहत-वाहत कानातील बाली पाताळलोकात गेली. त्यानंतर महादेवांनी लगेच आपल्या शिष्यांना बोलावून मणी शोधण्यास सांगितले. शिष्यांनी मणी शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांना काहीच सापडले नाही.


यामुळे महादेवांना खूप राग आला आणि त्यांनी क्रोधामध्ये आपला तिसरा डोळा उघडला. त्यांचे हे रूप पाहून सर्वजण घाबरले. त्यावेळी नैना देवी प्रकट होऊन महादेवाची मदत करण्यात तयार झाल्या. तेव्हापासून हे ठिकाण नैना देवी स्थान मानले जाते. नैना देवीने पाताळलोकात जाऊन शेषनागाकडे मणी परत देण्यास सांगितले. त्यानंतर शेषनागाने महादेवांना भेट स्वरूपात मणी दिला

बातम्या आणखी आहेत...