Home | Khabrein Jara Hat Ke | story of model who kidnapped, harassed men picking up from pubs and discos

क्लबमध्ये पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून घरी घेऊन जायची ही मॉडेल, मग करायची असे काही...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:03 AM IST

एका बिझनेसमनकडून तिने 6 कोटी वसूल करण्याचा प्रयत्न केला होता.

 • story of model who kidnapped, harassed men picking up from pubs and discos

  कोलंबिया - या सुंदर चेहऱ्यामागे एक कुख्यात क्रिमिनल लपला आहे. पाहताक्षणी कुणालाही आकर्षण वाटेल अशा या महिलेला पोलिसांनी नुकतीच अटक केली. कुठल्याही क्लब किंवा डिस्कोमध्ये ती तरुणांना आकर्षित करून आपल्यासोबत घेऊन जायची. यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ती त्यांचे अपहरण करायची. अपहरणानंतर ती या पुरुषांसोबत जे काही करायची ते धक्कादायक आहे. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, कोलंबियातील ही आरोपी तरुणी एक मॉडेलसह न्यूज चॅनलमध्ये सुद्धा काम करायची.


  प्रकरण असे आले समोर...
  - एका वेबसाईटनुसार 27 वर्षांची पॉलिना करीना डियाज (Paulina Karina Diaz) प्रसिद्ध टीव्ही होस्ट होती. पण सौंदर्याच्या जाळात अडकवून ती लोकांना किडनॅप करायची आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून पैशांची मागणी करायची. पॅलिनाला 'ला ब्रुजा' असेही म्हणतात. ती दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि लोक तिच्याकडे लवकर आकर्षितही होत असतात. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितले की, पॉलिनाने 2011 मध्ये बिझनेसमॅन लोपेज मोंकायो आणि वकील मिल्टन कारो विल्यमला तिच्या जाळ्यात अडकवले.
  - पॉलिना त्यांच्याबरोबर डेटवर गेली आणि डिस्कोमध्ये बराचवेळी त्यांच्याबरोबर मस्तीही केली. काही वेळात ते सर्व हॉटेलच्या रूममध्ये गेले. त्यावेळी तिने पार्टनरच्या मदतीने त्या दोघांना किडनॅप केले. त्यानंतर पॉलिनाने त्यांच्या कुटुंबीयांकडून 6 कोटींची खंडणी मागितली. या प्रकरणाचा खुलासा आता झाला आहे. मात्र अजूनही दोघे सापडलेले नाही. Channel 2 चे मालक म्हणाले पॉलिना आमच्याकडे काम करायची. पण ती फिक्स पगार घेत नव्हती. तिला प्रसिद्ध व्हायचे होते, त्यामुळे तिने कधी काही डिमांड केली नाही. ती मॉडेलिंगचे कामही करायची.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, पॉलिनाचे इतर काही Photos...

 • story of model who kidnapped, harassed men picking up from pubs and discos
 • story of model who kidnapped, harassed men picking up from pubs and discos
 • story of model who kidnapped, harassed men picking up from pubs and discos
 • story of model who kidnapped, harassed men picking up from pubs and discos

Trending