Home | International | Other Country | Story Of Most Cruel serial Killer In Human History theodor robert even demon Will Fear To See His Crime

सुंदर तरुणींना हेरून रेपनंतर करायचा मर्डर; मग मृतदेहावरही वारंवार करत होता बलात्कार; एवढा भयंकर होता हा सीरियल किलर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 09:06 AM IST

एवढा क्रूरकर्मा की सैतानालाही वाटावी भीती, पॉर्न पाहून बनला लिंगपिसाट...

 • Story Of Most Cruel serial Killer In Human History theodor robert even demon Will Fear To See His Crime

  इंटरनॅशनल डेस्क - जगाच्या इतिहासात सीरियल किलिंगचे अनेक भयंकर घटना घडलेल्या आहेत. यात 'सीरियल किलर' ठग बेहरामपासून ते निठारीच्या सुरेंद्र कोलीपर्यंत अनेकांची नावे आहेत. असेच एक नाव होते अमेरिकेच्या थियोडोर रॉबर्टचे. तो एवढ्या क्रूरकर्मा होता की, त्याने तब्बल 3 डझन महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवले होते.

   

  कोण होता थियोडोर रॉबर्ट
  अमेरिकेचा कुख्यात सीरियल किलर थियोडोर रॉबर्ट ऊर्फ टेडचा जन्म 24 नोव्हेंबर 1946 रोजी बर्लिंग्टनमध्ये झाला होता. किशोरावस्थेतच त्याच्या डोक्यात सेक्स आणि लैंगिक विषयांची जिज्ञासा जास्त होती. बहुधा यामुळेच तो पुढे चालून जगातला सर्वात क्रूर सीरियल किलर बनला. त्याने बलात्कार आणि हत्येशिवाय अपहरण, चोरी, दरोडे असे इतर अनेक गुन्हे केले.

   

  सुंदर तरुणींना करायचा टारगेट
  थियोडोर रॉबर्ट ऊर्फ टेड एका माथेफिरू होता. तो वासनांध होऊन काहीही करायला मागेपुढे पाहत नव्हता. यामुळे त्याच्या टारगेटवर नेहमी महिलाच असायच्या. त्याला त्यांच्यावर बलात्कार करून आसुरी आनंद मिळायचा. हे त्याच्यासाठी एखाद्या नशेसारखे होते.

   

  पुढच्या स्लाइडवर पाहा, एवढे क्रौर्य की सैतानालाही वाटावी भीती...  

   

 • Story Of Most Cruel serial Killer In Human History theodor robert even demon Will Fear To See His Crime

  एवढे क्रौर्य की सैतानालाही वाटावी भीती...

  थियोडोर रॉबर्ट ऊर्फ टेड आधी एखाद्या महिला वा तरुणीचे अपहरण करायचा. मग तिला निर्मनुष्य जागेवर नेऊन तिच्यावर बलात्कार करायचा. गोष्ट येथेच संपत नाही, त्या महिलेला वासनेची शिकार बनवल्यानंतर तो तिचा अत्यंत निर्घृणपणे खून करायचा. 

   

  मृतदेहावरही करायचा वारंवार बलात्कार
  पीडितेची हत्या केल्यानंतर त्याचा सैतान जागा व्हायचा. यानंतर तो संबंधित तरुणीच्या मृतदेहावर एकदा नव्हे, तर अनेकदा बलात्कार करायचा. आणि असे तोपर्यंत करायचा, जोपर्यंत मृतदेह सडत नाही. त्याच्या क्रौर्याच्या कहाण्या अख्ख्या अमेरिकेत चर्चिल्या जात होत्या. त्याचे नाव घ्यायलाही लोकांना भीती वाटू लागली होती.

 • Story Of Most Cruel serial Killer In Human History theodor robert even demon Will Fear To See His Crime

  घरात सजवून ठेवले महिलांचे कापलेले मुंडके...
  महिला टेडला सुंदर आणि आकर्षक असल्याचे सांगायच्या. यामुळेच तो सहज त्यांना जाळ्यात ओढायचा. तो आधी त्यांच्याशी फ्लर्ट करायचा आणि मग आपले पाशवी कृत्य करायचा. असे सांगतात की, त्याने आपल्या घरात 12 हून जास्त महिलांचे शिर धडावेगळे केले होते. आणि ते घरात सजवून ठेवले होते. जणू एखादी ट्राफीच आहे. या कृत्यावरून त्याच्या क्रौर्याचा अंदाज लावता येईल.


  अनेक शहरांत करायचा हत्या...
  थियोडोर रॉबर्टने त्याचा एक मित्र निल्सनला सांगितले होते की, त्याने पहिल्यांदा 1969 मध्ये ओसियन सिटीत एका महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न केला होता. त्याने 1971 पर्यंत कुणाचीच हत्या केली नव्हती. परंतु यानंतर 1974 ते 1978 दरम्यान त्याने 7 राज्यांमध्ये अनेक हत्या केल्या.

   

 • Story Of Most Cruel serial Killer In Human History theodor robert even demon Will Fear To See His Crime

  1975 मध्ये झाली अटक, मग गेला होता पळून
  अनेक हत्या करूनही टेड पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत राहिला. परंतु 16 ऑगस्ट 1975 रोजी पोलिसांनी अखेर त्याला अटक केलीच. परंतु कोर्टात सुनावणीसाठी जाताना 7 जून 1977 रोजी तो पोलिस कस्टडीतून पळून गेला. परंतु 6 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर 13 जूनला पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. यानंतर 30 डिसेंबर 1977 रोजी तो पुन्हा आपल्या घरातून फरार झाला. आणि मग 15 फेब्रुवारी रोजी त्याला पुन्हा अटक झाली.

   

  कोर्टाने सुनावली मृत्युदंडाची शिक्षा
  कोर्टाने 24 जानेवारी 1989 रोजी त्याच्यावर सुरू असलेल्या सर्व खटल्यांची सुनावणी पूर्ण केली. कोर्टाने आपला निकाल देताना त्याला समाजासाठी सर्वात मोठा धोका ठरवून मृत्युदंड ठोठावला. कोर्टाच्या आदेशानंतर फ्लोरिडाच्या तुरुंगात थियोडोर रॉबर्ट ऊर्फ टेडला सकाळी 7 वाजता इलेक्ट्रॉनिक चेअरवर बसवून मृत्यू देण्यात आला. त्याच्या मृत्यूनंतर रहिवाशांनी उत्सव साजरा केला. लोकांनी तेव्हा आतषबाजी करून आनंद व्यक्त केला होता.

   

 • Story Of Most Cruel serial Killer In Human History theodor robert even demon Will Fear To See His Crime

  मृत्युदंडापूर्वी दिला अखेरचा इंटरव्ह्यू
  टेडला मृत्युदंडाची शिक्षा जाहीर झाल्यानंतर देशभरातून त्याच्याकडे इंटरव्ह्यूसाठी हजारोंच्या संख्येने रिक्वेस्ट आल्या. टेडने सर्वांना धुडकावून लावले, परंतु डॉ. जेम्स डॉबसन यांना मात्र मुलाखतीचे कबूल केले. डॉ. जेम्सनी सांगितल्यानुसार, टेडने आपल्या आयुष्याचा प्रवास त्यांना या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितला. टेडने एका ठिकाणी म्हणालाही की, "मीही इतरांसारखे नॉर्मल आयुष्य जगत होतो. मलाही चांगले मित्र होते. परंतु एकदा मी पॉर्न कॅसेट्स पाहिल्या. सॉफ्टकोअर पॉर्न कंटाळल्यावर मी हिंसक पॉर्न पाहू लागलो. नंतर मला याची चटकच लागली. माझ्या हातून घडलेल्या कृत्यांसाठी हा घटकही जबाबदार आहे."

   

Trending