Home | Divya Marathi Special | Story of New Zealand Prime Minister Jasinda and his partner Clark

रांधा-वाढा-उष्टी काढा ही कामे महिलांचीच न राहता पुरुषही करू लागतील, तेव्हाच येईल खरी समानता...

दिव्य मराठी | Update - Mar 08, 2019, 11:14 AM IST

समानतेची सर्वात सशक्त कथा : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंदा यांचे पार्टनर क्लार्क यांनी ‘दिव्य मराठी’साठी लिहिली

 • Story of New Zealand Prime Minister Jasinda and his partner Clark

  ३८ वर्षीय जसिंदा वर्षभरात महिला सशक्तीकरणाची शक्तिशाली प्रतिमा बनल्या आहेत. त्या जगातील सर्वात कमी वयाच्या महिला पंतप्रधान आहेत. प्रसूती रजा घेऊन मातृत्व, करिअरमध्ये समानतेचा संदेश देणाऱ्या त्या एकमेव राष्ट्रप्रमुख आहेत...


  न्यूझीलंडच्या पंतप्रधान म्हणजे माझी पार्टनर जसिंदा आर्दनर व माझ्याबाबत वाचून आपणास वाटेल महिला समानतेच्या मुद्द्यात जग उलट्या दिशेने चालत आहे. आमच्या कथेत जसिंदा मातृत्व आणि देशाशी संबंधित जबाबदाऱ्यांत संतुलन साधताना दिसेल. प्रसूती रजेनंतर संसदेत दाखल होण्याच्या दिवसापासून आम्ही ९ महिन्यांच्या मुलीचा टीम म्हणून सांभाळ करत आहोत. मुलीला रोज आईचे प्रेम मिळावे व न्यूझीलंडला त्यांची पंतप्रधान मिळावी यासाठी मी आई व मुलीतील सेतूचे काम करतो. एक चकित करणारा किस्सा सांगतो. गेल्या वर्षी सप्टेंबरची घटना असेल. नीव तीन महिन्यांची होती. जसिंदांना संयुक्त राष्ट्रात भाषण देण्यासाठी जावयाचे होते. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनहून न्यूयॉर्कला विमानाने १७ तास लागतात. ६ दिवसांचा दौरा, ४० बैठका व येण्या-जाण्यात सुमारे ३७ तासांचा अवधी. तीन महिन्यांच्या मुलीने हे सहन करणे कठीण होते. मात्र, पंतप्रधान म्हणून जसिंदा यांना न्यूयॉर्कला जाणे आवश्यक होते. अन्यथा महिला असल्यामुळे देश सांभाळता येत नाही, असा आरोप झाला असता. नीवला सोबत नेले नसते तरी लोकांनी टीका केली असती.


  विमानाची वेळ मुलीच्या झोपेनुसार असावी, असे वाटत होते. नशिबाने अशी फ्लाइट मिळाली. विमानात जसिंदा मुलीला शांत करण्यासोबत भाषणाची तयारीही करत होती. १७ तासांच्या उड्डाणात मी जागा राहिलो व मायलेकीस झोपू दिले. जसिंदाला दुसऱ्या दिवशी यूएनमध्ये भाषण द्यावयाचे होते. यासोबत नीवने आईला भाषण देताना पाहावे, अशी एक इच्छा होती. दुसऱ्या दिवशी आईचे भाषण सुरू होताच नीवने शी केली. मी नीवला घेऊन डायपर बदलण्यासाठी जागा शोधू लागलो. मीटिंग रूममध्ये नीवची नॅपी बदलत असताना जपानचे शिष्टमंडळ आले. खोलीतील चित्र पाहून ते चकित झाले. यूएनच्या इतिहासात हा पहिलाच प्रसंग होता, त्यात एखाद्या देशाची पंतप्रधान तीन महिन्यांच्या मुलीसह बैठकीत सहभागी झाली होती. या क्षणाकडे जगातील महिला सबलीकरणाचे सर्वात सशक्त चित्र म्हणून पाहिले गेले. पुरुष पंतप्रधानांकडून ज्या जबाबदाऱ्यांची अपेक्षा असते त्या सर्व पार पाडाव्यात, असे जसिंदा यांना वाटते. यासोबत आई झाल्यावर महिलांचे करिअर समाप्त होते हा भ्रमही त्या समाप्त करू इच्छित होत्या. ही महिला मातृत्व व करिअर दोन्ही एकाच वेळी सांभाळण्यास सक्षम आहेत ही धारणा स्थापन करणे आवश्यक आहे. जसिंदा यांना मातृत्व प्राप्त झाल्यानंतर हे संतुलन आले. मात्र, त्याचबरोबर पंतप्रधानपदाच्या जबाबदाऱ्या कमी करत नाहीत. जसिंदा आई झाल्यानंतर आम्ही आपपसात जबाबदाऱ्या वाटून घेतल्या.


  नीवला आईसोबत जास्त वेळ कसा मिळेल यावर माझा भर असतो. संसद अधिवेशन काळात थोडा त्रास होतो. या काळात नीवला स्तनपान मिळावे यासाठी तिला घेऊन संसदेत जातो. व्यवसायाने मी डॉक्युमेंट्री शोचा निवेदक आहे. सध्या एका चित्रीकरणात व्यग्र आहे. नीवच्या जन्मापासून जबाबदार पालकाची भूमिका बजावत आहे. नीवमधील बदल अनुभवत आहे. हे मी कोणतेही महान काम करत नाही. मुलगी नीवच्या रूपात आमच्याकडे “वंडरफुल प्रॉब्लेम’ आहे.


  महिलांच्या वाट्याची कामे करण्यात खरी समानता
  मी दैनिक दिव्य मराठीच्या वाचकांना सांगू इच्छितो की, आपण सर्व पुरुष महिलांची समजली जाणारी सर्व कामे करू तेव्हाच महिलांना समानता मिळेल. तसे केल्यास महिलांना हवे ते करण्यास वेळ आणि संधी दोन्ही मिळेल. महिला-पुरुष समानतेतील हा सुखद क्षण असेल. आमच्या बाबतीत हे मॉडेल यशस्वी झाले आहे.- क्लार्क गेफोर्ड

Trending