आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांना Drugs देऊन करायचा बलात्कार, मग हत्या करून शिजवून खात होता त्यांचे मांस; पोलिस म्हणाले, हा तर जिवंत राक्षस!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील सर्वात क्रूरकर्मा सीरियल किलर जेफरी ढॅमरने केलेल्या हत्येच्या भयकथा पोलिसांनी समोर आणल्या आहेत. जेफरी होमोसेक्शुअल होता, जो महिला आणि पुरुष अशा दोहोंसोबत शारीरिक संबंध ठेवत होता. त्याच्या याच व्यसनाने त्याला एक कुख्यात आणि क्रूर गुन्हेगार बनवले. त्याने आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी पुरुष आणि युवा तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले. पोलिस रेकॉर्डनुसार, त्याने 17 तरुणांना ड्रग्स देऊन त्यांच्यावर बलात्कार केला आणि यानंतर त्यांचा खून केला. एवढेच नव्हे, तर त्या लोकांचे तुकडे करून तो मांस देखील अगदी शिजवून खायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेफरीने 1978 ते 1991 दरम्यान ही कृत्ये केली आहेत. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा त्यांनी याला Milwaukee Monster असे नाव दिले. तो एक जिवंत राक्षस आहे असे पोलिस म्हणाले होते. 

 

पोलिस किचनमध्ये पोहोचले तेव्हा...
पोलिसांनी सीरियल किलरची कसून चौकशी केली तेव्हा त्याने मानवी अंग किचनमध्ये ठेवल्याचे स्पष्ट केले. हे मानवी मांस त्याने शिजून खाल्ले होते अशी कबुलीही त्याने दिली. यानंतर सविस्तर तपास करण्यासाठी पोलिस त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. अधिकाऱ्यांनी फ्रिज उघडले तेव्हा धक्काच बसला. त्यामध्ये मानवी शिर आणि त्यांच्या शरीराचे तुकडे कापून ठेवण्यात आले होते. काही तुकड्यांवर तर मसाले सुद्धा लावून ठेवण्यात आले होते. जणू तो ते काढून कधीही खात होता. त्याच्या फ्लॅटमध्ये सर्वत्र मानवी शरीराचे तुकडे, मांस आणि हाड विखुरले होते. 

 

ड्रग्स देऊन करायचा बलात्कार
मीडिया रिपोर्टनुसार, जेफरी आधी आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांशी मैत्री करून त्यांना ड्रग्स देण्यासाठी घरी बोलवायचा. यानंतर त्यांच्यावर बलात्कार करून अतिशय निर्घृणरित्या त्यांचा खून करत होता. कित्येक वर्षे नरभक्षक होऊन मानवी मास खाणाऱ्या या नराधमाला पोलिसांनी 1991 मध्ये पकडले होते. त्यावेळी एक तरुण त्याच्या तावडीतून सुटला आणि थेट पोलिस स्टेशन गाठून आपबिती मांडली. 

 
कोर्टाने दिली 900 वर्षांची कैद
जेफरीने इतके अमानुष कृत्य केले की याला कोणती शिक्षा द्यावी असा प्रश्न न्यायाधीशांना पडला होता. कुठल्याही प्रकारची शिक्षा त्या नराधमासाठी कमीच वाटत होती. त्याला कोर्टाने 900 वर्षांची कैद सुनावली. यानंतरही त्याला जगण्याचा अधिकार नाही असे म्हणणाऱ्या पीडितांच्या कुटुंबियांनी वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केल्या. त्यावर सुनावणी सुरू असतानाच 1994 मध्ये दुसऱ्या एका कैद्याने तुरुंगातच त्याची हत्या केली. 

बातम्या आणखी आहेत...