आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्भुत आहे या नागिणीची गोष्ट, एकावेळी 100 सापांसोबत बनवते संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जगभरात सापांच्या विविध प्रजाती आढळतात. त्यातील काही विषारी असतात तर काही बिनविषारी. काहींच्या विषामुळे माणसाची वाचण्याची शक्यता कमी असते. आम्ही आज अशा एका नागिण विषयी सांगत आहोत जिच्याबद्दल आजपर्यंत तुम्हाला माहीत नसेल. 

 

रेड साईडेट गार्टर माटा असे या नागिणीचे नाव आहे. उत्तर अमेरिकेत या नागिणीची प्रजाती आढळते. ही नागिण एकाचवेळी 100 पेक्षा अधिक सापांसोबत संबंध प्रस्थापित करते. या प्रजातीचे साप शक्यतो समुहाने राहतात. यांच्या समुहातील सापांची संख्या 100 ते हजार पर्यंर असू शकते. त्यांच्या प्रजननच्या काळातही हे साप समुहानेच राहतात.  

 

यांचा प्रजनन प्रक्रिया अनेक कारणांमुळे खास आहे. प्रजनन प्रक्रियेच्या दोन आठवड्यांपूर्वी या प्रजातीचे नर साप अन्नाचा त्याग करतात. पोटातील सर्व घाण साफ व्हावी यासाठी ते असे करतात. संबंध प्रस्थापित करतेवेळी मादा साप आपल्या शरीरातून एका विशिष्ट प्रकारचे हार्मोन बाहेर सोडते. यामुळे नर साप त्यांच्या आकर्षित होतात. 

 

संबंध बनवतेवेळी मादा साप स्वतःला सावरत एक विशेष प्रकारचे वेटोळे तयार करते. यानंतर नर साप एक-एक करून तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करतात. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मादा साप हळूहळू तिच्या मूळ रूपात येते. असे केल्याने ती नर सापांच्या तावडीतून लवकर सुटका करून घेते आणि आपला जीव वाचविण्यात यशस्वी होते. असे न केल्यास नागिणचा मृत्यू होऊ शकतो.

 

रेड साइडेड गार्टर प्रजातीचे साप पाणतळ ठिकाणी राहतात. डोंगर किंवा गवताळ प्रदेशात तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये लपून बसतात. या सापाची एक विशेष बाब म्हणजे हे विषारी नाहीत. 

 

बातम्या आणखी आहेत...