शेठने एका आंधळ्या भिकाऱ्याला शंभर रुपये दिले, भिकाऱ्याला वाटले हा कागदाचा तुकडा आहे, असे समजून त्याने पैसे फेकून दिले, भिकाऱ्याजवळ आणखी एक माणूस उभा होता, जेव्हा त्याने हे पहिले तर काय केले ?

विचार न करता संधी हातची जाऊ देऊ नये, नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागतो... 

दिव्य मराठी वेब टीम 

Mar 31,2019 04:37:00 PM IST

रिलिजन डेस्क : एक आंधळा भिकारी रोज रस्त्याच्या कडेला भीक मागायचा. त्याला जे काही थोडेफार पैसे मिळायचे त्याच्यात तो त्याचा दिवस भागवायचा. त्याचे या जगात कुणीच नव्हते. एक दिवस त्या रस्त्यावरून एक खूप श्रीमंत शेठ जात होते. तेव्हा त्यांची नजर त्या आंधळ्या भिकार्यावर पडली. त्याची हालत पाहून शेठला त्याची दया आली आणि त्यांनी आपल्या खिशातून 100 रुउपायांची नोट काढून त्याच्या हटवार ठेवली. भिकाऱ्याला पैसे देऊन शेठ तिथून निघून गेले. आंधळ्या भिकाऱ्याने जेव्हा नोट हातात घेऊन समजून घेण्याचं अप्रयत्न केला तेव्हा त्याला अवतले की, कुणीतरी त्याच्या हातात कागदाचा एक तुकडा टाकला आहे.
कारण त्याआधी भिकारीला कधीच कुणी 100 ची नोट दिली नव्हती. 100 ची न आकाराने मोठी असल्यामुळे भिकाऱ्याला वाटले कि हा कागदाचा तुकडा असावा. त्यामुळे भिकाऱ्याने ती न फेकून दिली. शेजारी उभा असलेला एक माणूस हे सर्व पाहत होता. त्याने जेव्हा पहिले की, भिककार्याने ती न फेकून दिली तेव्हा त्याने त्याला याचे कारण विचारले.
तेव्हा भिकाऱ्याला कळाले की, तो ज्याला कागदाचा तुकडा समजत होता ती तर 100 रुपयांची नोट आहे. तेवढे पैसे भिकाऱ्यांची खूप मदत करू शकत होते. भिकाऱ्याला हे कळल्यानंतर तो खूप खुश झाला आता त्याचे काही दिवस तरी आरामात जाणार होते.

लाइफ मॅनेजमेंट.
अनेकदा आपण हाती आलेल्या संधी ओळखात नाही आणि आणि मग ती वाया जाते. पण जेव्हका आपल्याला कळते की, ती संधी आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरू शकली असती. तेव्हा आपल्याला दुःख होते. त्यामुळे विचार ना करता हाती आलेल्या एखाद्या संधीला असे सहज जाऊ देऊ नये.

X
COMMENT