आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या मनात पद किंवा पैशांचा अहंकार असल्यास तुम्ही कोणतेही ज्ञान प्राप्त करू शकत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका मोठ्या अधिकाऱ्याला आपल्या पदाचा खूप गर्व होता. एके दिवशी त्याला एक सिद्ध व्यक्तीविषयी समजले. त्याने त्या व्यक्तीला गुरु बनवून त्यांच्याकडून काही ज्ञानाच्या गोष्टी जाणून घ्याव्यात, असा विचार केला. त्या संताला शोधण्यासाठी अधिकारी जंगलात गेला.


जंगलात पोहोचल्यानंतर त्याला एक साधारण मनुष्य दिसला. त्याला पाहून अधिकाऱ्याने विचारले- अरे ये, येथे सिद्ध संतांचा आश्रम कुठे आहे? तो व्यक्ती त्या अधिकाऱ्याचे शब्द ऐकूनही काहीच बोलला नाही आणि आपले काम करत राहिला. हे पाहून अधिकाऱ्याला खूप राग आला.


त्याचा अपमान झाला असल्याचे त्याला वाटले आणि रागामध्ये लालबुंद झालेल्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला लाथ मारली आणि पुढे निघून गेला. पुढे गेल्यानंतर अधिकाऱ्याला आणखी एक व्यक्ती भेटला आणि त्याने त्यालाही तोच प्रश्न विचारला.


त्या व्यक्तीने अधिकाऱ्याला सांगितले- त्या महान व्यक्तीला कोण ओळखत नाही, ते तिकडेच राहतात जेथून तुम्ही आला आहात. येथून जवळच त्यांचा आश्रम आहे. मीसुद्धा त्यांच्याच दर्शनासाठी जात होतो. तुम्ही माझ्यासोबतच चला. अधिकारीही त्या व्यक्तीसोबत प्रसन्न होऊन चालू लागला.


अधिकारी सिद्ध योगींच्या आश्रमात पोहोचल्यानंतर त्याला तेथे तोच व्यक्ती दिसला ज्याला त्याले लाथ मारली होती. हे पाहून अधिकारी त्या संतांच्या चरणात पडला आणि माफी मागू लागला. संत त्याला म्हणाले- एखादा व्यक्ती मातीचा माठही विकत घेत असेल तर चांगल्याप्रकारे पारखून घेतो. मग तू तर मला गुरु बनवण्यासाठी आला होता. संतांची सहिष्णुता पाहून अधिकारी नतमस्तक झाला.


लाइफ मॅनेजमेंट 
तुम्ही एखाद्याकडून काही ज्ञान घेण्यासाठी जात असाल तर सर्वात पहिले स्वतःच्या अहंकराचा त्याग करावा. कारण जोपर्यंत मनात अहंकार आहे तोपर्यंत तेथे ज्ञानासाठी जागा शिल्लक नसते. दुसरी शिकवण म्हणजे, सामान्य दिसणारा व्यक्तीही ज्ञानी असू शकतो, यासाठी बाह्य आवरण पाहून एखाद्याविषयी कोणतेही मत तयार करू नये.

बातम्या आणखी आहेत...