आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Christmas Day: ही आहे ख्रिसमस डे दिवशी मुलांना गिफ्ट देणाऱ्या 'सांता क्लॉज'ची गोष्ट, जाणून घ्या ख्रिसमसच्या इतरही प्रथा-परंपरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 डिसेंबर येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवशी भारतासह संपूर्ण जगात ख्रिसमसचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. याप्रसंगी देशीतील सर्व शहरांमध्ये लोकांच्या घरी ख्रिसमस ट्री सजवण्यात येते. याशिवाय ख्रिसमस डे निमित्त विविध रीति-रिवाज साजरे केले जातात. 

 

काय आहेत हे रूढी परंपरा जाणून घ्या

वर्षाच्या शेवटी येणारा सण म्हणजे ख्रिसमस डे. या दिवसाला फार महत्व देण्यात येते. कारण येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. यातील काही गोष्टी अतिशय विशेष आहेत. 

 

सांता निकोलस: 
सांता निकोलसला प्रत्येक मुलगा ओळखतो. विशेषतः 25 डिसेंबर रोजी सर्व मुले सांता क्लॉजची आतुरतेने वाट पाहत असतात. सांता निकोलसचा जन्म येशू ख्रिस्तांच्या मृत्यूपश्चात 280 वर्षानी तिसऱ्या शतकात मायरा येथे झाला होता. लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर निकोलस यांचा फक्त येशू ख्रिस्तांवर विश्वास होता. मोठे झाल्यानंतर त्यांनी आपले आयुष्य देवाला समर्पित केले. 

 

सांता निकोलस सुरूवातील पादरी बनले आणि नंतर बिशप. त्यांना लोकांची मदत करणे फार पसंत होते. ते गरीब मुलांसाठी भेटवस्तू देत असत. आपल्याला कुणीही पाहू यासाठी ते अर्ध्यारात्री गिफ्ट देत असत. यामुळेच त्यांना सांता हे नाव मिळाले. सांता निकोलस यांच्यामुळे आपण आजही ख्रिसमस डेच्या दिवशी सांताची वाट पाहत असतो.  


ख्रिसमस ट्री: 

भगवान येशू ख्रिस्तांचा जन्म झाला तेव्हा सर्व देवता त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या आई-वडिलांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यादिवसापासून आजपर्यंत ख्रिसमस डे च्या निमित्ताने सदाहरित अशा फरच्या वृक्षाला सजविण्यात येते. यालाच ख्रिसमस ट्री म्हणतात. ख्रिसमस ट्रीची सुरुवात जर्मनीमध्ये दहाव्या शतकादरम्यान करण्यात आली. बोनिफेंस टुयो या धर्मप्रचारकाने याची सुरुवात केली. 
  
कार्ड देण्याची परंपरा
जगातील पहिले ख्रिसमस कार्ड 1842 मध्ये विलियम अँगलेद्वारा आपल्या पालकांना आनंदी करण्यासाठी पाठविण्यात आले होते. या कार्डवर एका शाही परिवाराती सदस्याचा फोटो होता. यानंतर ही परंपरा सुरू झाली आणि यामुळे लोकांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. 

बातम्या आणखी आहेत...