आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद जवानाच्या वडिलांनी सांगितले, अन्न-पाण्यासाठी झालो महाग, आता जगण्याची इच्छा नाही; सून म्हणाली कोणालाही एक फुटकी कवडी देणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गिरिडीह (झारखंड) - बीएसएफ जवान सीताराम उपाध्याय शहीद होऊन चारही महिने झाले नाहीत परंतु त्यांच्या नावावर मिळणाऱ्या पैशांसाठी घरामध्ये वाद सुरु झाले आहेत. यामध्ये एकीकडे पत्नी रश्मी उपाध्याय आणि दुसरीकडे शहीद जवानाचे नेत्रहीन वडील बृजनंदन उपाध्याय आणि आई आहेत. वाद सुरु होण्याचे कारण म्हणजे, शहीद जवानाची पत्नी रश्मीला 26 लाख रुपये मिळाले आहेत. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी सुनेकडे त्यामधील थोडेसे पैसे मागितले परंतु सुनेने एक फुटकी कवडीही देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनी गावातील आणि शेजारी राहणाऱ्या लोकांना याविषयी सांगितले.


गावकऱ्यांनी रश्मीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु...
गावातील लोकांनी या संदर्भात रश्मीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही मार्ग निघाला नाही. शेवटी बृजनंदन यांचे भाऊ रामकिंकर उपाध्याय यांनी रश्मीची चर्चा केली परंतु रश्मी तयार झाली नाही. त्यानंतर हे प्रकरण एसपीकडे गेले. यापूर्वी सीआरपीएफची एक टीम शहीद जवानाच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या वडिलोपार्जित घरी पालगंजला पोहोचली. नवरात्रीनिमित्त कपडे आणि मिठाई भेट दिली. त्यानंतर हा वाद सुरु झाला.


100 टक्के रकमेची मीच हकदार, माझ्या जीवालाही धोका 
- संस्मरण दिवसाच्या निमित्ताने गिरिडीह येथे सन्मान घेण्यासाठी पोहोचलेल्या रश्मीने आपल्या जीवाला धोका असल्याचे एसपी सुरेंद्र झा यांना सांगितले. त्यानंतर झेंडा मैदानात पत्रकांनाही सासरच्या लोकांकडून जीवाला धोका असल्याचे सांगितले.


- शहीद पतीला मिळालेल्या पैशांवर काही लोकांचा वाईट डोळा आहे आणि पैसा मिळवण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहे. यासाठी मला धमकीही मिळाली आहे. यासोबतच असेही सांगण्यात आले आहे की, मुलांची आणि स्वतःची काळजी असेल तर मिळालेली रक्कम किंवा आणखी मिळणाऱ्या रकमेचे सामान दोन भाग करून सासू-सासऱ्याला पैसे द्यावेत.


- धमकीचा आरोप रश्मीने चुलत सासरा रामकिंकर उपाध्याय यांच्यावर लावला आहे. असेही सांगितले आहे की, सासू-सासरे चांगल्या मनाचे आहेत परंतु रामकिंकर उपाध्यायसारखे लोक दोघांनाही माझ्याविरुद्ध वाईट सांगत आहेत.


- याचवेळी रश्मीने असेही सांगितले की, मिळणाऱ्या रकमेतील एक फुटकी कवडीही कोणाला देणार नाही आणि याचा दुरुपयोगही करणार नाही.


व्हायरल व्हिडीओच्या तपासाची मागणी
रश्मी उपाध्यायने सांगितले की 'सासरवाडीतील काही लोक जे नात्यामध्ये तिचे दीर लागतात त्यांनी सोशल मीडियावर झाले काही व्हिडीओ व्हायरल केले आहेत. या व्हिडीओ संदर्भात पोलिसांनी तपास करावा. व्हायरल झालेला व्हिडीओ जुना असून यामध्ये मी आपल्या मित्रांसोबत एक प्रोग्राम करताना दिसत आहे. परंतु काही लोक चुकीच्या पद्धतीने हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रश्मीने केला आहे.'


जगण्याची इच्छा नाही -  बृजनंदन 
सुनेने पत्रकारांना सांगितलेल्या गोष्टीमुळे रविवारी संध्याकाळी शहीद सीतारामचे वडील बृजनंदन उपाध्याय, आई रामकिंकर उपाध्याय एसपी झा यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी सांगितले की, मी नेत्रहीन असून पत्नी आजाराने ग्रस्त आहे. आमच्याकडे आणि खाण्यासाठी अन्न नाही आणि आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसेही नाहीत. या सर्व परिस्थितीमध्ये सुनेचे असे वागणे पाहून दुःखी झालो आहोत आणि आता जगण्याची इच्छा नाही. अकाली मृत्यूमध्ये आता आयुष्य बदलेल असे वाटत आहे.


रश्मीचे आरोप खोटे : रामकिंकर 
रामकिंकर उपाध्याय यांनी रश्मीचे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, मी फक्त एवढेच सांगितले की, ज्यांनी आयुष्यभर पालन-पोषण केले त्यांना त्याचा थोडातरी हक्क मिळावा. यासाठी काही ठराविक रक्कम मिळालेल्या पैशातून त्यांना देण्यात यावी, ज्यामुळे उरलेले आयुष्य ते दोघे सुखात काढू शकतील.

बातम्या आणखी आहेत...