आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी सीताने स्वयंवराच्या माध्यमातूनच का केली श्रीरामाची पती रूपात निवड? कशामुळे केले जात होते स्वयंवर?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंवर शब्दाची जोड आहे - स्वयं आणि वर. आशय वधूने स्वतःचा वर निवडावा. प्राचीन काळात भारतामध्ये ही प्रथा होती. यानुसार कन्येला तिला हवा तसा वर निवडण्याचा अधिकार होता. देवी पार्वतीद्वारे महादेवांची निवड, सीतेचे स्वयंवर आणि द्रौपदीचे अर्जुनाशी लग्न हे सर्व या परंपरेचे उदाहरण आहेत. राम आणि कृष्ण युगात या प्रथेसोबतच वराचे शौर्य प्रदर्शनही जुळलेले होते. प्रभू श्रीरामाला जनक राजाच्या  दरबारात महादेवाचे शिव धनुष्य उचलल्यामुळे देवी सीता आणि अर्जुनाला माशाचा डोळा बाणाने फोडल्यामुळे द्रौपदी पत्नी रूपात मिळाली होती.


सीता स्वयंवराची कथा वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानसच्या बालकांडसहित सर्व रामकथांमध्ये आढळून येते. वाल्मिकी रामायणामध्ये जनकद्वारे सीतेसाठी 'वीर्यशुल्का' (पराक्रमानेच प्राप्त करण्यायोग्य)चे वर्णन आढळून येते. याचा अर्थ जनकाने हा निश्चय केला होता की, जो व्यक्ती आपला पराक्रम प्रदर्शन रूपातील शुल्कला देण्यास समर्थ असेल तोच सीतेशी लग्न करू शकेल. या अर्थामध्ये वीर्यशुल्का कन्या सीतासाठी स्वयंवराचे आयोजन करण्यात आले होते. एकप्रकारे ही प्रथा तत्कालीन समाजात स्त्रियांच्या सशक्ततेचे श्रेष्ठ उदाहरण आहे. ज्यामध्ये आपला जोडीदार निवडण्यासाठी पित्याचा आग्रह किंवा दुराग्रह नसून मुलीलाच वराची निवड करण्याचा सामाजिक अधिकार प्राप्त होता.

बातम्या आणखी आहेत...