आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहंकारात असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे सर्वांसमोर शरमेने मान खाली घालावी लागेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहंकारात असे कोणतेही काम करू नका ज्यामुळे सर्वांसमोर शरमेने मान खाली घालावी लागेल
एका शहरात एक खूप शूरवीर तलवारबाज राहत होता. त्याचे शौर्य पाहून राजाने त्याला सेनापती बनवले. त्याने अनेक युद्धामध्ये राज्याला विजय मिळवून दिला. अनेक वर्ष त्याने आपल्या राज्याची सेवा केली. काही काळाने त्याला तो वृद्ध होत असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्याने आपली तलवार चालवण्याची कला इतरांना शिकवण्याचा विचार केला.


ही गोष्ट त्याने राजालाही सांगितली. राजालाही त्याची कल्पना आवडली. राजाने दवंडी देऊन ही बातमी संपूर्ण राज्यात सांगितली. दुसऱ्याच दिवशी सेनापतीकडे तलवारबाजी शिकण्यासाठी लोक येऊ लागले. अशाचप्रकारे काही दिवस निघून गेले. त्या शिकणाऱ्या लोकांमध्ये एक तरुण अत्यंत जलद गतीने तलवार चालवू शकत होता.


काही दिवसांमध्येच त्या तरुणाला आता आपण गुरूपेक्षा चांगली तलवार चालवू शकतो असे वाटू लागले. तरुण राजाकडे जाऊन म्हणाला- महाराज, आता मी सेनापतीपेक्षा चांगली तलवारबाजी करू शकतो. यामुळे तुम्ही मला सेनापती बनवावे.


राजा म्हणाला- पहिले तू सेनापतीला पराभूत करून तुझे कर्तृत्त्व सिद्ध करून दाखव. राजाने 7 दिवसांनी दोघांचा तलवारबाजीचा सामना घोषित केला. त्यानंतर तरुणाला आपण सेनापतीकडून पराभूत तर होणार नाही ना अशी भीती वाटू लागली. तो लपून-लपून सेनापतीचा पाठलाग करून त्याच्या रणनीती जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला.


तरुणाने पाहिले की, सेनापतीने लोहाराकडे जाऊन 15 फूट लांब म्यान बनवली आहे. तरुणाला वाटले एवढ्या लांब तलवारीने तर सेनापती मला क्षणात पराभूत करतील. हे पाहून तरुणाने 16 फूट लांब तलवार बनवली.


सामन्याच्या दिवशी दोघेही समोरासमोर आल्यानंतर तरुणाला सेनापतीच्या हातामध्ये सामान्य तलवार दिसली. सामना सुरु झाला आणि तरुणाने आपली 16 फूट लांब तलवार म्यानमधून काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यापूर्वीच सेनापतीने आपली तलवार तरुणाच्या मानेवर ठेवली.


अशाप्रकारे काही क्षणातच हा सामना सेनापतीने जिंकला. तरुणाला आता आपल्या गर्वाचा पश्चाताप झाला आणि त्याने सेनापतीची माफी मागितली. सेनापती तरुणाला म्हणाले- मी तुझ्यावर मानसिक दबाव टाकण्यासाठी 15 फूट लांब म्यान बनवली होती, तलवार नाही. कधीही आपल्या कौशल्याचा गर्व करू नये.


लाईफ मॅनेजमेंट
काही लोकांना आपल्या कौशल्यावर खूप गर्व होतो. याच गारावामुळे ते असे काही काम करून बसतात ज्यामुळे नंतर पश्चताप करावा लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, कोणतीही लढाई फक्त ताकदीने नाही तर बुद्धिनेही जिंकली जाते.

बातम्या आणखी आहेत...