आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Story Of Teen’s Miracle Survival After Being Sucked Out Of Plane, Where She Was The Only Survivor Out Of 91

विमानावर विज पडून झाला मोठा धमाका, 91 पैकी 90 लोकांचा झाला मृत्यु, पण ती एकटीच बचावली....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेरू- ही रहस्यमयी गोष्ट आहे एका टीनेजर ची, जी एका भयानक विमान दुर्घटनेत एकटी जिवंत बचावली. ही घटना 24 डिसेंबर 1971 ची आहे. पेरूची राजधानी लीमावरून उडान घेणारी फ्लाइट 508, पुकालपा शहराकडे जात होती. खराब वातावरणामुळे विमान 21 हजार फुटाच्या ऊंचीवरून उडु लागले. त्या दरम्यान ते एका भयानक वादळात अडकले. विमान जोराने हलु लागले पण पायलटने त्या अवस्थेत विमानाला उडवले. अचानक विमानाच्या इंजिनवर विज पडून आग लागली. आग लागताच विमानाच्या एका भागात विस्पोट होऊन विमान क्रॅश होउ लागते. त्यावेळी 17 वर्षाची जूलियन तिच्या बसलेल्या सीटसहित बाहेर फेकल्या गेली आणि ती 3.5 किमी दूर जाऊन पडली.

 

- विमान क्रॅश होउन जूलियान विमानाच्या सीट सोबत फेकल्या गेली आणि 3 किलोमीटर दूर अॅमेझॅानच्या जंगलाच पडली.  9700 फुटाच्या ऊंचीवरून पडल्यामुळे तिच्या शरीराला अनेक फ्रॅक्चर झाले, अनेक जखमा झाल्या, तिच्या शरीराच्या मांसपेशी फाटल्या गेल्या पण तरिही चमत्कारिकरित्या ती जीवंत राहीली.

 

- तिला 19 तासानंतर शुद्ध आली तेव्येहा ती तशाच  सीटला बांधलेल्या अवस्थेत होती. भयानक वेदनेत ती कसेबसे उठुन उभे राहते. 

 

अॅमेझॅानच्या जंगलात राहीली जिवंत
- जगण्याची हिम्मत तिने अजुन सोडली नव्हती. तिमा  तिच्या वडिलांची शिकवण आठवली. वडिलांनी शिकवलेल्या सर्वायव्हल टेक्नीक्सच्या आधारे तीने स्वत: ला वाचवले. संगटांना न घाबरता ती पुढे राहीली. पुढे तिला विमानाचे तुटलेले भाग सापडले, ज्यात तिला चॅाकलेटची बॅग सापडली. ते सापडलेले चॅाकलेट खाउन ती अनेक दिवस जिवंत राहीली.

 

- 10 दिवस सलग चालुन ती जंगलाच्या बाहेर तर पडली, पण तोपर्यंत तिच्या जखमां सडून गेल्या होत्या, त्यात किडे पडले होते. पण तसेच ती पुढे चालत राहीली.  पुढे तिला एक गाव दिसले. तेथे तिला गावातल्या लोकांनी मदत केली. 

 

- त्या भयानक विमान दुर्घटनेत क्रु मेंबर आणि पॅसेंजर असे एकुण 90 लोकांचा जीव गेला. पण ईतक्या वरून पडून सुद्धा जूलियन कशी वाचली हे रहस्य अजून तसेच आहे.

 

- जूलियान आता 64 वर्षाची आहे, आणि आजही ती चर्चेत असते.

बातम्या आणखी आहेत...