Home | International | Other Country | Story of The Most Infamous King Who Slept With Sisters

तो King नव्हे, हैवान होता! बहिणींसोबत संबंध बनवून वेश्यालयात विक्री, पत्नीला नग्न करून मित्रांसमोर फेकले; प्रजेला द्यायचा इतक्या विचित्र शिक्षा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:00 AM IST

कालिगुलाची चौथी पत्नी खूप सुंदर आणि बुद्धिमान होती. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या मित्रांसमोर तिला नग्न करून फेकले.

 • Story of The Most Infamous King Who Slept With Sisters

  इंटरनॅशनल डेस्क - जगाच्या इतिहासात अशा काही घटना आणि माणसं होऊन गेली की त्या अजुनही मानवतेसाठी कलंक मानल्या जातात. अशीच एक कहाणी जगातील सर्वात कुख्यात राजाची आहे. हा किंग इतका घाणेरडा होता की त्याने आपल्याच बहिणींसोबत शारीरिक संबंध बनवून त्यांना वेश्यालयात विकले. एवढेच नव्हे, तर आपल्या मित्रांसोबत पत्नीचे कपडे काढून फेकून दिले. जो राजा आपल्या बहिण आणि पत्नीवर इतका अत्याचार करत असेल त्याच्या जनतेला काय-काय सहन करावे लागत असेल याचा विचारही केल्यास अंगावर काटा येतो. आज आम्ही आपल्याला सर्वात कुख्यात राजा गाएस ज्युलिएस सीझर जर्मेनिकस उर्फ 'कालिगुला'ची गोष्ट सांगत आहोत. कलिगुला रोमचा तिसरा सम्राट होता. काही लोक त्याला दिवाळखोर म्हणतात. 2000 वर्षे जुन्या या राजाच्या अत्याचाराच्या कथा ऐकूण आपल्यालाही धक्का बसेल.

  बकरीचे नाव ऐकताच छाटायचा मुंडके...
  उंच परंतु सळपातळ राहिलेला कालिगुला आपल्या अजब आदेशांमुळे बदनाम होता. शरीर तसा मजबूत होता परंतु, त्याचे डोळे बारीक आणि मध्ये गेल्यासारखे दिसायचे. त्यामुळे, लोक त्याची थट्टा मस्करी करताना बकरी म्हणायचे. त्याचा या राजाला इतका राग होता की त्याने बकरी शब्दावर जणू बंदीच घातली होती. चुकून एखाद्या व्यक्तीने त्याच्यासमोर बकरी असे नाव काढल्यास तो आपल्यालाच चिडवत असल्याचे समजून राजा त्या व्यक्तीचे मुंडके छाटण्याचे आदेश देत होता.


  घोड्याला बनवले मंत्री...
  कालिगुला राजाला आपल्या साम्राज्यात लांब केस सुद्धा आवडत नव्हते. एखाद्या व्यक्तीचे लांब केस दिसल्यास त्याला पकडून केस उपटण्याची शिक्षा देत होता. कालिगुलाला घोड्यांची विशेष आवड होती. त्यातील आपला आवडता घोडा इनसिटॅटसवर तो खूप प्रेम करायचा. त्याने आपल्या या घोड्यासाठी महाल बांधले होते. जेणेकरून घोडा आरामात राहू शकेल. त्याच घोड्याला आपल्या दरबारात मंत्री पद देऊन त्याने हद्दच केली होती.


  बहिणीसोबत बनवले संबंध
  कालिगुलाशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी इतिहासात नमूद आहे. त्याने आपल्या बहिणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. किशोरावस्थेत कालिगुला आपल्या पणजीसोबत राहत होता. याच दरम्यान त्याने आपली बहिण जूलिया ड्रूसिला हिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर राजा बनला आणि त्याने आपल्या त्या बहिणीला वेश्यालयात विकले. परिवारातील इतर महिला आणि आपल्या बहिणींसोबतही त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्या सर्वांना वेश्यालयात विकले होते.


  पत्नीला नग्न करून मित्रांसमोर फेकले
  कालिगुलाने चार विवाह केले होते. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. यानंतर त्याने दुसऱ्या महिलेचे अपहरण करून तिच्याशी लग्न केले. त्याची तिसरी पत्नी सुद्धा आधीपासूनच विवाहित होती. त्याची चौथी पत्नी पत्नी मिलोनियाने त्याला काही प्रमाणात नियंत्रणात ठेवले होते. परंतु, याची शिक्षा तिला या हैवानाने दिली होती. कालिगुलाची चौथी पत्नी खूप सुंदर आणि बुद्धिमान होती. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आपल्या मित्रांसमोर तिला नग्न करून फेकले. तसेच तिला नग्न परेड करण्यासाठीही भाग पाडले.


  मोत्या विरघळून प्यायचा, सोन्यात आंघोळ
  हा राजा आपल्या टबमध्ये सोन्याचे दागिणे आणि नाणी टाकून आंघोळ करायचा. अनेकवेळा तो फक्त सोन्यावरच पाय ठेवून चालायचा. त्याला सोने खूप प्रिय होते. तो मोती विरघळून त्याचा अर्क प्यायचा. या बदनाम राजावर अनेक चित्रपट आणि डॉक्युमेंट्री बनवण्यात आल्या आहेत.

 • Story of The Most Infamous King Who Slept With Sisters
 • Story of The Most Infamous King Who Slept With Sisters

Trending