Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Story of the servant and owner in Marathi

कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना प्रत्त्येक पर्यायाचा विचार अवश्य करावा 

रिलिजन डेस्क | Update - Feb 06, 2019, 12:01 AM IST

एका शेठजीच्या डोळ्यात इन्फेक्शन झाले, डॉक्टर म्हणाले- तुम्हाला 7 दिवस फक्त हिरवा रंगच पाहावा लागेल, शेठजीला काय करावे ते

 • Story of the servant and owner in Marathi

  एका शहरामध्ये एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. एकदा त्याच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झाले. त्याने शहरातील सर्वात प्रसिद्ध डोळ्यांच्या डॉक्टरांकडून उपचार करून घेतले परंतु काहीच फरक पडला नाही.


  डोळ्यांच्या उपचारासाठी तो वेदशातही गेला आणि अनेक हकीम, वैद्यांना डोळे दाखवले. एका डॉक्टरांनी त्याला सांगितले की, तुमचे डोळे ठीक होऊ शकतात परंतु त्यासाठी तुम्हाला 7 दिवस फक्त हिरवा रंग पाहावा लागेल, इतर कोणताही रंग पाहू नये.


  शेठजीला प्रश्न पडला की सात दिवस फक्त हिरवा रंगच कसा काय पाहायचा. त्यानंतर त्याने आपल्या नोकरांना संपूर्ण बंगल्याला हिरवा रंग देण्यास सांगितले आणि बंगल्यातील सर्व वस्तुही हिरव्या रंगाच्या ठेवा असे सांगितले.


  शेठजीचा एक नोकर समजूतदार आणि हुशार होता. त्याला ही बातमी समजल्यानंतर तो शेठजींकडे आणि म्हणाला- संपूर्ण बांगला हिरवा करण्यात तर खूप खर्च होईल. मी तुम्हाला असा एक उपाय सांगतो, ज्यामुळे कमी खर्चात तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकते.


  शेठजीने विचारले- कसे काय? नोकर म्हणाला- तुम्ही एक हिरव्या काचांचा चष्मा खरेदी करा. यामुळे तुम्हाला सर्वकाही हिरवे दिसू लागेल आणि तुमचा खर्चही वाचेल. हे ऐकून शेठजीला खूप आनंद वाटला आणि त्याने नोकराला बक्षीस दिले.


  लाईफ मॅनेजमेंट
  अनेकवेळा समस्या खूप मोठी असते परंतु त्याचे समाधान अत्यंत छोटे असते. यामुळे आपण प्रत्येक पर्यायाचा विचार केल्यानंतर एखादा निर्णय घ्यावा, अन्यथा नंतर आपल्याला स्वतःच्या मूर्खपणावर पश्चाताप करावा लागू शकतो.

Trending