आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिण असावी तर अशी, प्रियकरासोबत घरातून पळून गेलेल्या मैत्रिणीला शोधण्यासाठी गेली, एक महिना ज्यूस फॅक्टरीत काम केले, नवऱ्यालाही सोडले पण शेवटी शोधून काढले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा(मध्यप्रदेश)- भुसावळ-इटारसी पॅसेंजर ट्रेनमधुन जीआरपीने एका युवतीला खंडवा प्लॅटफार्मवर उतरवले. प्रियकरासोबत नवदुर्गेच्या दरम्यान गावातून पळून गेलेल्या युवतीला तिच्या मैत्रिणीने नाशिकमधून शोधून काढले. मैत्रिणीसोबत नाशिक ते भुसावळ फिरण्यासाठी आलेल्या युवतीला जेव्हा गावाकडे जाण्याचे कळाले तेव्हा तिने गदारोळ केला. घरी नाही जाणार असे म्हणत तिने ट्रेनमधून उडी मारण्याच्या तयारीत होती. 

 

ट्रेनच्या दाराकडे गेलेल्या तरूणीला तिच्या मैत्रिणीने काही लोकांच्या मदतीने मध्ये ओढले. हा गदारोळ सुरू असताना ट्रेनमधील एका पॅसेंजरने याची सुचना जीआरपीच्या हेल्पलाइन डेस्क 182 वर दिली. ट्रेन खंडवाला पोहचल्यावर जीआरपीच्या महिला अधिकाऱ्यांनी युवतीला खाली उतरवले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबाला याची माहिती देण्यात आली.


मैत्रिणीला शोधण्यासाठी एक महिना ज्यूस फॅक्टरीत काम केले
प्रियकरच्या प्रेमामुळे घरातून पळालेल्या युवतीला शोधण्यासाठी गेलेल्या तिच्या मैत्रीणीने सांगितले की, आम्ही दोघी नातेवाईक आहोत. आधी आम्ही नाशिकमध्ये कुटुंबासोबत काम करायचो. नव दुर्गा पूजेदरम्यान जेव्हा मातेचे विसर्जन होत होते, तेव्हा तो यवक आला आणि तिला घेउन नाशिकला पळून गेला. ती घरातुन पळाल्यामुळे तिची आई आजारी पडली, मला हे पाहवले नाही. त्यानंतर मी नवऱ्याकडून परवानगी घेतली आणि तिला शोधण्यासाठी गेले. येथे एक महिना मी ज्यूस फॅक्टरीत काम केले. त्यानंतर तिचा शोध लागला आणि तिला भुसावळ फिरवण्याच्या बहाण्याने इटारसीच्या पॅसेंजर ट्रेनमध्ये बसवले, आणि घरी आणले.

बातम्या आणखी आहेत...