Home | National | Other State | story of Virat Kidnapping Scandal in Chhattisgarh's Bilaspur

विराट किडनॅपिंग प्रकरण; आई म्हणाली होती घरात ये बाळा, विराट म्हणला होता येतो आणि एका मिनीटातच झाले अपहरण, आई रडत म्हणाली-माझ्या मुलाला सोडा, त्याला आईपासून वेगळ करू नका...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 24, 2019, 12:52 PM IST

वडील म्हणाले- दुधाशिवाय काहीच खात-पीत नाही तो

 • story of Virat Kidnapping Scandal in Chhattisgarh's Bilaspur

  बिलासपूर(छत्तीसगड)- भाजप कार्यालयासमोरून शनिवारी अपहरण झालेल्या भांडे व्यापाऱ्याच्या मुलाचा तिसऱ्या दिवशीपण पत्ता लागला नाहीये. पोलिस अजूनही तपास करत आहेत. एस.पी. अभिषेक मीणा यांनी सांगितले की, यात अट्टल गुन्हेगारांचा हात असल्याचा संशय आहे, तसेच मुलाच्या शोधासाठी दोन टीम आम्ही उत्तरप्रदेश आणि झारखंड पाठवली आहे. बाहेर राज्यासोबतच शहरातही त्याचा शोध सुरू आहे. विराटच्या अपहरणामागचे कारण अजून स्पष्ट झाले नाहीये. विराटच्या घरी अजून खंडणीसाठी फोनदेखील आलेला नाहीये.


  पोलिसांच्या ढीसाळ कारभारामुळे वर्दळीच्या ठीकाणामधून अपहरणकर्त्यांनी विराटचे अपहरण केले. पोलिसांनी त्यांच्या पाठलाग केला नाही आणि नाकाबंदीदेखील केली नाही. घटनेनंतर पोलिस विभागाचे सर्व अधिकारी घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज चेक करण्यात व्यस्त राहीले. त्यांच्याकडे मोठे गुन्हे हँडल करणारा कोणीच एक्सपर्ट अधिकारी नाहीये.


  घटनेची माहीती सगळीकडे पसरल्यावर लोकांनी त्याच्या घरी येणे सुरू केले आणि त्याच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली. लोक म्हणाले आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या बाजुने आहोत.


  सीएमडी चौक, हेमूनगर, बन्नाक चौक सिरगिट्टीमध्ये पाहण्यात आली कार
  अपहरकर्त्यांनी मुलाला उचलल्यानंतर जुन्या बस सँडकडे पळाले. तेथील सीसीटीव्ही कॅमेरात ही कार दिसत आहे. त्यानंतर ती कार सीएमडी चौकात दिसली. मंगळवारी पोलिसांना लोकांनी त्या नंबर नसलेल्या कारबद्दल सांगितले की, ही कार हेमूनगरवरून बन्नाक चौक सिरगिट्टीकडे जाताना दिसली.


  आयजींनी एस.पी. च्या अंडर एक जिल्हा स्तरिय टीम बनवली
  आयजी प्रदीप गुप्तांनी रविवारी सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांची आपातकालीन बैठक बोलावली आणि आतापर्यंत झालेल्या कारवाईचा तपशील मागवला. त्यांनी सांगितले की, मुलाच्या शोधासाठी जिल्हास्तरीय टीम बनवण्यात आली आहे. याचे सुपरविजन एस.पी. अभिषेक मीणा स्वत: करत आहेत.

  क्राइम पेट्रोलमध्ये दाखवली होती अशाच प्रकारची घटना
  विराटच्या वडिलांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी टीव्हीवर क्राइम पेट्रोल लागले होते. त्यातही अशाच प्रकारे अपहरण केलेले दाखवण्यात आले होते. निवडणुकीची वेळ होती, सगळे पोलिस नेत्यांच्या सुरक्षेसाठी गेले होते आणि त्यातच मुलाचे अपहरण केले जाते.

Trending