आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-मुलावर एकदाच अंत्यसंस्कार झाले; मात्र यापासून अनभिज्ञ महिला दोघांना भेटण्याच्या आशेने निवांत झोपतेय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर (बिहार) येथील 30 वर्षीय अारती जखमी झाली. तिच्यावर उपचार सुरू अाहेत. तिचा पती जितेंद्र व दीड वर्षीय मुलगा शिवमचा मृत्यू झाला. संवेदनशील प्रशासनाने या पिता-पुत्रांचे मृतदेह एकाच शवपेटीत दाेन दिवसांपर्यंत ठेवले. रविवारी दाेघांवर एकाच वेळी, एकाच चितेवर अंत्यसंस्कारही करण्यात अाले. इकडे रुग्णालयात अारती शुद्धीवर येताच पती व मुलाविषयी विचारणा करू लागली. तिची प्रकृती गंभीर असल्याने अद्याप तिला पती व मुलाच्या मृत्यूबाबत सांगण्यात अाले नाही. ते दाेघेही ठीक असल्याचे सांगितले जाते. या दाेघांचीही पुन्हा भेट हाेईल या अाशेने ती पुन्हा बेशुद्ध हाेतेय. डाॅक्टरांच्या मते, अारतीची प्रकृती ठीक हाेण्यासाठी अजून काही दिवस तरी लागू शकतील. 

 

40 लाेकांना ढकलून वाचवले, खांदा तुटला, मात्र हिंमत कायम 
हे अाहेत 45 वर्षीय बलजिंदर सिंह. तेही रेल्वे ट्रॅकवर उभे हाेते. अचानक त्यांची नजर रेल्वेकडे गेली. बलजिंदर यांनी रुळावरील लाेकांना बाहेर ढकलले. त्यांच्या प्रयत्नांमुळे वाचलेले हरजित व शिवपाल यांनी सांगितले, लाेकांना वाचवण्याच्या नादात बलजिंदर यांना रेल्वेचा धक्का लागला. त्यात त्यांचा खांदा तुटला. पाेलिसांच्या मते, बलजिंदर यांनी सुमारे 40 लाेकांचे प्राण वाचवले. 

 

अपघाताची माहिती कळताच महिला रक्तदानासाठी धावली 

या अाहेत 80 वर्षीय रजनी मल्हाेत्रा. त्यांना रात्री 8.30 वाजता दुर्घटनेची माहिती कळली. जखमींना रुग्णालयात अाणले असेल, त्यांना रक्ताची गरज भासेल, असा विचार करुन त्यांनी रात्री 11 वाजता थेट रुग्णालय गाठले. रक्तदान करण्याची इच्छा डाॅक्टरांकडे बाेलून दाखवली. मात्र वयाेमानामुळे डाॅक्टरांनी नकार दिला. तेव्हा त्यांनी जखमींची सेवा करण्यास सुरुवात केली. 

बातम्या आणखी आहेत...