Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Story Theft Case: Director Ram Gopal Varma came to aurangabad court

कथा चोरी प्रकरण: दिग्दर्शक रामगोपाल वर्मा कोर्टात आले, न बोलता निघून गेले

विशेष प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 08:47 AM IST

कथाचोरीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावताच प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा गुरुवारी तीन वकिलांसह

 • Story Theft Case: Director Ram Gopal Varma came to aurangabad court

  औरंगाबाद- कथाचोरीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावताच प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा गुरुवारी तीन वकिलांसह जिल्हा न्यायालयात हजर झाले. याप्रकरणी यांनी औरंगाबादचे कथालेखक मुश्ताक मोहसीन सिद्दिकी यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आपली कथा चोरून वर्मा यांनी कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा दावा त्यांनी केला अाहे. जिल्हा न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने वॉरंट रद्द केल्यानंतर बाहेर पडताच सेल्फीसाठी चाहत्यांनी गराडा घातला. गर्दीतून वाट काढत कुणालाही न बोलता वर्मा मुंबईला निघून गेले.


  सिद्दिकींनी १९९४ मध्ये लिहिलेली 'जंगल में मंगल' कथा मुंबईच्या फिल्म रायटर्स असोसिएशनकडे कॉपीराइट म्हणून नोंदवली. यावर चित्रपट काढावा म्हणून त्यांनी ही कथा वर्मा यांना पाठवली. मात्र, प्रतिसाद न देता वर्मांनी आपल्याच कथेवर 'अग्यात' हा भयपट काढला, असा दावा करत सिद्दिकी यांनी २००९ मध्ये दिवाणी न्यायालयात दाखल केला, परंतु तो दावा फेटाळला. सिद्दिकी यांनी २०१० मध्येही फौजदारी दावा दाखल केला. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. एप्रिल २०१७ मध्ये हे प्रकरण सुनावणीस आले असता न्यायालयाने वर्मा यांना नोटीस पाठवून म्हणणे मांडण्याचे आदेश दिले, मात्र ते हजर झालेच नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या नावे अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे आदेश दिले. गुरुवारी कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अटक वॉरंट रद्द करावा व पुढच्या सुनावणीस हजर न राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती.


  कोर्टाने दिली होती म्हणणे मांडण्याची संधी; हजर न राहिल्याने काढले वॉरंट
  वॉरंट केले रद्द : सिद्दिकी यांचे वकील प्रदीप वाळुंजकर यांनी सांगितले की, वर्मा यांनी कॉपीराइट सेक्शन ५१/६३/६५ चा भंग केल्याने फौजदारी दावा दाखल केला आहे. नोटीस पाठवूनही ते हजर न झाल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांचे अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केले, परंतु पुढच्या सुनावणीस गैरहजर राहण्याची विनंती मान्य केलेली नाही. या प्रकरणाची पुढीली सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे.


  रामूसह वकिलांचेही नो कॉमेंट्स...
  कोर्टरूममधून बाहेर पडताच वर्मांना पत्रकार, छायाचित्रकार आणि विविध चॅनलचे प्रतिनिधी दिसताच त्यांनी नो कॉमेंट्स म्हणत आवारात लांबवर पार्क केलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारकडे धाव घेतली. तोवर सर्वांनीच त्यांचे फोटो आणि शूटिंगही घेतले. त्यांच्यासोबत मुंबईहून आलेल्या वकिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.


  कोर्टरूमभोवती गर्दी...
  गुरुवारी सकाळी ११.१० वाजता वर्मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कैलास कुरुंदळे यांच्यासमोर हजर झाले. न्यायालयात खाली मान घालून ते मोबाइलवर सर्फिंग करीत होते. ते आल्याची माहिती मिळताच कोर्टरूम भोवती गर्दी झाली. एक तास २० मिनिटे ते कोर्टरूममध्ये होते. वॉरंट रद्द होताच बाहेर पडताच गर्दीने घेरले. वकिलांसह पोलिसांनाही त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.


  माझ्या कथेवरच काढला 'अग्यात' हा भयपट : दावा
  मी नूतन कॉलनीत राहतो. १९८३ पासून कथा लिहितो. मी १९८४ पासून मुंबईत चित्रपट सृष्टीत वावरत आहे. आजवर १५ कथा लिहिल्या. 'जंगल में मंगल' ही मी लिहिलेली कथा रामगोपाल वर्मा यांना १९९८ मध्ये कॉपीराइट करून २५, मकणी हिल्स या पत्त्यावर पाठवली होती. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र त्यांचा 'अग्यात' हा भयपट २००९ मध्ये रिलीज झाला. तो माझ्या'जंगल में मंगल' या कथेवरच बेतला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मी त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल केला, असे कथालेखक सिद्दिकी यांनी ' दिव्य मराठी'ला सांगितले.

Trending