आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंदमानमधील सेंटिनेल बेटावर गेल्यामुळे तेथील आदिवासींनी नुकतीच एका अमेरिकन नागरिकाची हत्या केली आहे. अंदमान बेट समुहावर आजही अनेक प्राचीन आदिवासी प्रजाती आहेत. त्या मानवी जगापासून दूर असल्याने लोकही त्या परिसरात जात नाहीत. सेंटिनील प्रजात तर अतिदुर्मिळ जाहीर करण्यात आली आहे.
अंदमान निकोबरमध्ये अशीच आणखी एक आदिवासी जमात आहे जी 55 हजार वर्षे जुनी आहे. ती म्हणजे जरावा जमात. येथे परंपरेच्या नावाखाली जमातीत लोक स्वतःच्या मुलालाच मारतात. जर एखादे बाळ काळ्या रंगाऐवजी थोडे जरी गोरे असले तरी परंपरेच्या नावाखाली आदिवासी लोक त्यांना मारतात. जर बाळ काळ्या रंगाऐवजी थोडेही गोरे असले तरी त्याला समुदयातील लोक मारतील अशी भिती आईला वाटत असते. हा समुदाय 90 च्या दशकात सर्वप्रथम जगासमोर आला होता. यांना जगाशी संपर्क ठेवणे आवडत नाही.
अनेक कारणांनी मारतात मुले
- आफ्रिकी वंशाच्या या समुदयातील लोक प्रचंड काळे असतात. या समुदायाच्या परंपरेनुसार मुलांची आई विधवा झाली किंवा तिचा पती दुसऱ्या समुदायाचा असेल तर त्या मुलालाही मारले जाते. बाळ जराही गोरे असेल तर कोणीही त्याचा वडील बाहेरचा व्यक्ती आहे असे समजून त्याची हत्या करतो. समुदायात यासाठी दुसरी शिक्षाही नाही. या समुदायाबाबत अभ्यासक सांगतात की, जरावा समुदायात बाळाचा जन्म झाला की, सर्व महिला त्याला दूध पाजतात. त्यामुळे समुदायाचे पावित्र्य कायम राहते असे समजले जाते.
पर्यटकांवर बॅन
या आदिवासींच्या भागात बाहेरच्या लोकांना प्रवेश नसतो. अंदमान ट्रंक रोडच्या जवळपास असलेल्या रहिवासी भागात हे लोक राहतात. काही वर्षांपूर्वी या समुदायाच्या महिलांबरोबर काही पर्यटकांनी गैरव्यवहार केला होता, असे सांगितले जाते. त्यानंतर काही वर्षांनी 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने या मार्गावरून पर्यटकांना बंदी घातली होती. नंतर या निर्णयात दुरुस्तीही केली होती.
समुदाय नष्ट होण्याच्या मार्गावर
- रिपोर्ट्सनुसार या समुदायातील केवळ 400 लोक शिल्लक आहेत. असे समजले जात आहे की, आगामी दहा वर्षांत हा समुदाय पूर्णपणे लुप्त होऊ शकतो. कारण या भागातून एक महामार्ग तयार केला आहे. त्यामुळे या भागात लोकांची वर्दळ वाढली आहे.
वन्य प्राणी खाऊन उदरनिर्वाह..
- जरावा समुदायातील लोक वन्य प्राणी खाऊन उदरनिर्वाह करतात. हजारों हजारो वर्षांपासून ते असेच जगत आले आहेत. ते फळे आणि मधही खातात. तज्ज्ञांच्या मते या प्रजातीला 150 हून अधिक झाडे आणि 350 हून अधिक जीव जंतूंबाबत माहिती असते. ते स्वतः औषधीही तयार करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.