आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Strange Dog Keeps Coming Over To Nap At Her House, Then Lady Finds A Note On His Collar

महिलेच्या घरी आला अनोळखी कुत्रा, तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवले म्हणून रोज येऊ लागला घरी, महिलेला कळत नव्हते कारण, नंतर त्याच्या कॉलरवर सापडली एक चिठ्ठी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- एका महिलेने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर आपल्यासोबत घडलेला खुप चांगला अनुभव शेअर केला आहे. एके दिवशी महिलेच्या घरी एक अनोळखी कुत्रा आला, त्यानंतर तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या दिवसापासून रोज रात्री तो कुत्रा महिलेच्या घरी येऊ लागला आणि थोडावेळ झोपून निघून जायचा. तिला यामागचे कारण कळत नव्हते, पण नंतर जेव्हा तिला कारण कळाले तेव्हा तिला धक्का बसला.


कुत्र्याच्या अशा वागण्याने हैराण होती महिला

- आपल्या फेसबूक अकाउंटवर स्टारी शेअऱ करताना तिने लिहीले, एके दिवशी मला माझ्या घराच्या अंगानात एक कुत्रा फिरताना दिसला. तो खुप म्हातारा आणि थकलेला दिसत होता.
- त्याची प्रकृती पाहून वाटत होते की, तो कोणाचा तरी पाळीव कुत्रा आहे पण त्याला नीट जेवण भेटत नाही. त्याला बोलवताच तो महिलेच्या जवळ आला, महिलेने खुप प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
- त्यानंतर महिला आपल्या घरात जात होती, तेव्हा कुत्राही मागे-मागे हॉलपर्यंक गेला. हॉलमध्ये जाताच तो कुत्रा एका कोपऱ्यात झोपी गेला. अंदाजे तासाभरानंतर तो निघून गेला.
- दुसऱ्या दिवसी दुपारी परत तोच कुत्रा तिच्या घरी आला आणि हॉलच्या त्याच कोपऱ्यात झोपी गेला. असेच अनेक दिवस होत राहीले, तो कुत्रा रोज यायचा आणि तासभर झोपून निघून जायचा. महिलेला कळत नव्हते की, असे का होत आहे.


महिलेने जाणून घेतले कारण
- एके दिवशी महिलेने कुत्र्याच्या कॉलरवर एक चिठ्ठी लावली. त्यात तिने लिहीले, 'मला जाणून घ्यायचे आहे की, या कुत्र्याचा ओनर कोण आहे ?, आणि तुम्हाला माहिती आहे का की, तुमचा कुत्रा रोज आमच्या घरी येऊन झोपतो.'
- दुसऱ्या दिवशी तो कुत्रा परत आला तेव्हा त्याचा कॉलरवर चिठ्ठी होती, त्याचावर लिहीले होते, 'हा कुत्रा अशा घरात राहतो जिथे 6 मुले आहेत, ज्यापैकी दोघांचे वय तीन वर्षांपेक्षा कमी आहे. याठिकाणी त्याची झोप पूर्ण होत नाही म्हणून तो रोज तुमच्याकडे झोपायला येत आहे.'
- ती चिठ्ठी वाचून महिलेला त्या कुत्र्यावर खुप दया आली आणि प्रेमही वाढले. तेव्हा पासून रोज महिला त्या कुत्र्याची वाट पाहते आणि तोही रोज न चुकता तिच्या घरी येतो.

 

बातम्या आणखी आहेत...