आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Strange Type In Bihar ...! One Accused Got Bail But Escaped Another Accused, Confused By The Same Name

बिहारमधील अजब प्रकार...! एका आरोपीला मिळाला जामीन पण सुटला दुसरा आरोपी, एकाच नावामुळे झाला गोंधळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा(बिहार)- ज्या आरोपीला जामीनावर बाहेर निघायचे होते, तो तुरुंगातच राहिला आणि ज्याला शिक्षा भोगायची होती तो बाहेर आला. बिहारच्या सिवान जिल्ह्यात हा चकीत करणारा प्रकार घडला आहे. या जिल्ह्यातील तुरुंगात एकाच नावाचे दोन व्यक्ती शिक्षा भोगत होते. योगायोगने दोन्ही आरोपी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होते, तसेच या दोघांनीही आपापल्या वकिलांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. या दोन्ही आरोपींची नावे गुल मोहम्मद होती.


या दोघांपैकी एक गुल मोहम्मद हा ओदीखोर गावातील राहाणारा होता, त्याची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर त्याने पाटणा उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. यादरम्यान, सहसराव गाव येथील राहाणारा गुल मोहम्मद याचा जामीन मंजूर झाला. या गुल मोहम्मदला तुरुंगातून सोडण्याचे कागदपत्रही जारी करण्यात आले, पण इखेत माळी शिंकली.

 

रिलीज पेपरमध्ये सहसराव गावातील गुल मोहम्मदच्या जागी ओदीखोर गावातील गुल मोहम्मदची माहिती भरण्यात आली. यामुळे सगळा गोंधळ झाला आणि ज्या गुल मोहम्मदला जामीन मिळाला होता, तो तुरुंगातच राहिला आणि ज्याला जामीन नाकारला होता त्याला सोडण्यात आले.

 

दुसरीकडे, जामीन मिळाल्यावरही जेव्हा सहसराव गावाचा गुल मोहम्मद बाहेर नाही आला, तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी वकिलाकडे याबाबत तक्रार केली. वकिलाने माहिती दिल्यावर हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर खऱ्या गुल मोदम्मदला जामीनावर सोडण्यात आले. गैरसमज होऊन ज्या हुल मोदम्मदला जामीनावर बाहेर सोडण्यात आले होते त्याने लगेच आत्मसमर्पणही केले.