आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काऊंटरवर गेल्यावर समजले, 2 वर्षांच्या मुलीचेही तिकिट घ्यावे लागेल, मग अशी झाली 54 हजारांची व्यवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओमाहा - अमेरिकेत एक व्यक्ती 2 वर्षांच्या मुलीसोबत विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला समजले की मुलीचेही तिकिट घ्यावे लागेल. तिकिटाठी 54000 रुपये लागणार होते. लगेच एवढे पैसे कसे जमवायचे याची त्याला काळजी वाटू लागली. तेव्हा बाजुला उभ्या असलेल्या एका महिलेने त्यांना पैशाची मदत केली. ही गोष्ट एका पॅसेंजरला समजली तेव्हा त्याने सोशल मीडियावर ती शेअर केली आणि काही काळातच ती व्हायरलही झाली.


विमानतळावर झाला सर्व गोंधळ काळाला
>  घटना नेब्रास्का स्टेटच्या ओमाहा शहरातील आहे. या क्तीने ट्रिपवर जाण्यासाठी विमानाचे एक टिकिट खेरेदी केले तेव्हा त्याची मुलगी 1 वर्षांची होती. पण ज्यादिवशी ट्रिपवर जायचे होते तेव्हा ती 2 वर्षांची झाली होती. 
> विमानतळावर गेल्यावर चेक इन करण्यासाठी तिकिट काऊंटरवर गेले तेव्हा डेस्क अटेंडंटने त्यांना हे सांगितले. त्यांनी सांगितले की, मुलीचे वय 2 वर्ष आहे, त्यामुळे नियमानुसार तिचे तिकिटही घ्यावे लागेल.
> हे ऐकल्यावर त्या व्यक्तीला धक्का बसला. 54000 रुपयांची व्यवस्था कशी करावी हे त्याला कळेना. पण त्याशिवाय त्याला ट्रिपलाही जाता येणार नव्हते. 

 

अनोळखी महिलेने केली मदत
>  जवळच उभी असलेली एक महिला हे सर्व ऐकत होती. तिथेच तो व्यक्ती विचार करू लागला की, ऐन वेळेवर कोणाला मदत मागावी.

> त्याचवेळी ती अनोळखी महिला मुलीच्या वडिलांकडे गेली आणि मदतीचा हात पुढे केला. त्यांना विमानाचे तिकिट खरेदी करुन दिले, हे पाहुन त्या व्यक्तीला अश्रु अनावर झाले.

 

सोशल मीडियावर व्हायरल 
> केवीन लेस्ली नावाच्या व्यक्तीने हा सगळा प्रकार पाहिला आणि त्या महिलेची उदारता, मदतपूर्ण स्वभाव याचे वर्णन केले. 

> केवीनने महिलेची स्तुती करणारी फेसबुक पोस्ट व्हायरल केली आणि काही काळातच त्या महिलेची ओळख पटली. त्या महीलेचे नाव डेबी बॉल्टन आहे, ती नॉवेक्स कंपनी की को-फाउंडर आहे.

 

बातम्या आणखी आहेत...