आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसदरम्यान अचानक आला कुत्रा, स्पर्धकांसोबत धावून 100 मीटरच्या शर्यतीत पटकावले दुसरे स्थान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. येथील एका विद्यापिठात विद्यार्थ्यांच्या शर्यतीदरम्यान एक कुत्रा अचानक मध्ये आला आणि विद्यार्थ्यांसोबत धावू लागला. एवढेच नाही तर त्या कुत्र्याने दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


ही 100 मीटरची स्पर्धा 23 मे रोजी चीनच्या निंगशियातील बीफांग यूनिव्हर्सिटी स्पोर्ट्स इव्हेंट अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान अचानक रेसमध्ये येणारा हा कुत्रा याच यूनिव्हर्सिटी कॅंम्पसमध्ये मागील 4 वर्षांपासून राहत होता. आयोजकांच्या माहितीनुसार, कुत्रा स्पर्धा सुरू असताना अचानक आला. त्यामुळे कोणाला काहीच करता आले नाही. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. तसेच या कुत्र्याने स्पर्धाकांच्या बरोबरीन रेस पूर्ण केली आणि दुसरा क्रमांक पटकावला.