आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी रुग्णाचा पाय कापला, पण कुत्र्याने तोंडात धरून नेला; ऑपरेशन थिएटरमध्ये हतबल होऊन पाहत राहिले डॉक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बक्सर - बिहारच्या बक्सरमधून अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे. येथे रेल्वेतून पडून जखमी झालेल्या एका व्यक्तीवर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सुरू होते. तेवढ्यात एक भटका कुत्रा ऑपरेशन थिएटरमध्ये घुसला आणि रुग्णाचा कापलेला पाय तोंडात घरून पळून गेला.

 

- सूत्रांनुसार, रुग्णाचा रेल्वे अपघात बक्सर रेल्वे स्टेशनवर झाला होता. आराचे रामनाथ मिश्रा बक्सरहून आराकडे जाणारी श्रमजीवी एक्स्प्रेस पकडत होते. तेवढ्यात त्यांचा पाय घसरला आणि ते रेल्वेखाली आले. घाईगडबडीत जखमी पॅसेंजर रामनाथ मिश्राला रेल्वे पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केले. 


- गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी रामनाथचा पाय शरीरापासून वेगळा काढून ठेवला होता. यादरम्यान बाहेरून एक भटका कुत्रा ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झाला अन् कापलेला पाय तोंडात धरून पसार झाला. तथापि, उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला.

 

काय म्हणतात सिव्हिल सर्जन
याप्रकरणी सिव्हिल सर्जन डॉक्टर के. के. लाल म्हणतात की, सध्या त्यांना या प्रकरणात कोणतीही सूचना मिळालेली नाही. ते म्हणाले की, जर असे काही घडलेच असेल, तर दोषींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...