आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्यातून ओढून एका वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचे लचके तोडत होते भटके कुत्रे; हकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा Body घेऊन पसार, अद्याप पत्ता नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - मानवतेला काळिमा लावणारे हे दृश्य बिहारच्या सितामढी जिल्ह्यातील आहे. या फोटोमध्ये कुत्रे एका वर्षभराच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहाचे लचके तोडत आहेत. काही वेळापूर्वीच तो मृतदेह कचऱ्याच्या ढिगारात होता. तो कुत्र्यांनी ओढून बाहेर काढला. भटक्या कुत्र्यांनी असे करतानाचे लोक ये-जा करताना फक्त पाहत होते. परंतु, कुणीही समोर येऊन त्यांना रोखण्याचे आणि प्रकरणी दखल घेण्याचा प्रयत्न केला नाही. दोन तासानंतर एक कुत्रा तो मृतदेह घेऊन निघून गेला. परंतु, कुत्र्यांनी तो मृतदेह कुठे नेला याचा कुणालाच पत्ता नाही.


कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मृतदेह घेऊन पसार...
बिहारसह उत्तर भारतात मंगळवारी छठ पूजा आणि प्रार्थनेत लोक व्यस्त होते. याच दरम्यान संध्याकाळी एका कचऱ्याच्या ढिगाराजवळ काही कुत्रे मांसाच्या लोंढ्याचे लचके तोडताना दिसून आले. तो प्रत्यक्षात एका वर्षभराच्या मुलाचा मृतदेह होता. त्याच्या शरीराचा खालचा निम्मा भाग त्या कुत्र्यांनी पस्त केला होता. हे भयंकर दृश्य रस्त्यावरून पायी आणि गाड्यांमध्ये जाणारे सगळेच पाहत होते. परंतु, कुणीही समोर येऊन दखल देण्याचा प्रयत्न केला नाही. याच दरम्यान आमच्या प्रतिनिधीने फोटो टिपला आणि लोकांनी कुत्र्याला हकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो श्वान अर्ध्या उरलेल्या मृतदेहाला तोंडात धरून पसार झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांनी त्याचा मृतदेह अशा ठिकाणी फेकून दिले असे सांगितले जात आहे. 


पोलिसांना अद्याप पत्ताच नाही...
या प्रकरणाची डॉक्टरांसह पोलिसांना सुद्धा काहीच माहिती नाही. स्थानिक पोलिस निरीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याकडे अद्याप यासंदर्भात तक्रार आलेली नाही. सोबतच घटनेची माहिती पत्रकार आणि स्थानिकांकडून मिळाली. परंतु, त्या मृतदेहाचा पोलिसांना काहीच पत्ता नाही. आता मात्र, पोलिस त्या मृतदेहाचा आणि त्याची ही अवस्था करणाऱ्या त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...