आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवळपास 20 कोटींमध्ये तयार झालेल्या \'बधाई हो\' ने कमावला 501% नफा, अनेक चित्रपटांना दुप्पटीने झाला फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. आयुष्मान खुराणा आणि सान्या मल्होत्रा स्टारर 'बधाई हो' चित्रपट सर्वात कमी बजेटमध्ये बनलेला आणि जास्त प्रॉफिट मिळवणारा चित्रपट असणार आहे. अवघ्या 22 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 132 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रेक्षक अजूनही या चित्रपटाला पसंती देत आहेत. तर 300 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या आमिर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तां'चित्रपटाने आतापर्यंत एकूण बजेटच्या अर्धीच कमाई केली आहे. यावरुन स्पष्ट होते की, प्रेक्षकांना आता हवा हवाई चित्रपट पसंत येत नाही. आता प्रेक्षक स्टार बेस्ड चित्रपटांऐवजी नाविन्यपुर्ण असणा-या चित्रपटांना पसंती देत आहेत. 
'रेस 3' आणि 'ठग्ज ऑफ हिंदोस्तां' सारख्या बिग बजेट चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले 
प्रेक्षकांना आता रटाळ स्टोरी आणि विदेशी लोकेशनवर हिरोइनसोबत रोमान्स करणारा हिरो नको आहे. त्यांना कथेमध्ये नाविन्य हवे असते. विशेष म्हणजे कमी बजेटच्या चित्रपटांमधून लोकांना हे मिळतेय आणि लोक पसंती देत आहेत. यामुळेच स्त्री, बरेली की बर्फ, मसान, सोनू के टीटू की स्वीटी, अंधाधुन आणि बधाईसारख्या चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली. 'रेस 3' आणि 'ठग्ज ऑफ हिन्दोस्तां' सारख्या बिग बजेट चित्रपटांना अपयश मिळाले. यामुळे आता स्टार पावरमुळे काम चालणार नाही तर कन्टेट चांगला असावा आणि कथा दमदार असणे आवश्यक आहे. यावर्षी ज्या कमी बजेटच्या चित्रपटांनी चांगले यश मिळवले आहे त्या चित्रपटांमध्ये साम्यता आहे. हे चित्रपट मातीशी जोडले गेले आहे यामध्ये विदेशी लोकेशन नाही. 


2018 चे सर्वात जास्त प्रॉफिट कमावणारे टॉप-9 चित्रपट 
2018 मध्ये सर्वात जास्त कमाई करणा-या चित्रपटांमध्ये कमी बजेटच्या चित्रपटांचा समावेश आहे. आयुष्मानचा 'बधाई हो' चित्रपट सध्या सर्वात प्रॉफिटेबल असणारा दूसरा चित्रपट आहे. पण ज्या गतीने या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे, हे पाहून चित्रपट लवकरच एक नंबरच्या स्थानावर येईल असे दिसतेय. सध्या एक नंबरला 'स्त्री' हा चित्रपट आहे. जवळपास 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'स्त्री'ने 129.67 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच स्त्रीला 548 टक्के प्रॉफिट झाला आहे. तर 'बधाई हो'ला 501 टक्क्यांचा फायदा झाला आहे. हा चित्रपट दूस-या स्थानावर आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त फायदा मिळणा-या चित्रपटांमध्ये तिन्ही खान(सलमान, आमिर,शाहरुख) यांचा एकही चित्रपट नाही. आम्ही तुम्हाला आज 2018 मधील सर्वात जास्त नफा मिळवणा-या चित्रपटांविषयी सांगणार आहोत.

 

 

बातम्या आणखी आहेत...