आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातापायातले बळच गेले!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या स्थिर, साचेबंद आणि काहीशा बेफिकीर आयुष्यात काही अपेक्षित नसलेल्या घटना घडतात. स्थिर पाण्यात एखादा खडा टाकल्यानंतर तरंगाची वलये बराच वेळ उठत राहतात. सिडको एन-8 परिसरात 1989 पासून आम्ही राहतो. तेव्हा हा भाग खरंच धोकादायक, असुरक्षित असा ओसाड परिसर होता. नाले, जंगल वाढलेले. पर्ण सोसायटीत 4-5 घरे अन् तीही हजार हजार फुटांच्या अंतरावर. कुठलीही सुविधा नसलेला हा भाग. पण तेव्हा घडले असते तर आश्चर्य नव्हतं. असा प्रसंग नुकताच घडला. रात्रीच्या वेळी खिडकीचा आवाज आला. मांजर असेल असे वाटले आणि पुन्हा झोपले. एक-दोन मिनिटांत फरशीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. मांजरीने काहीतरी पाडले. तिला हाकलावे हे ठरवून पटकन बेडरूममधून उठून किचनमध्ये आले.

पहिले तर हॉलचे दार सताड उघडे होते. क्षणभर वाटले, दार उघडे तर राहिले नाही? इतक्यात मागे फिरले तर एक तरुण भरकन वळला. त्याच्या मागेच दुसरा तरुण दिसला. ‘कोण रे तू?’ ‘कोण आहे?’ असे विचारता दोघेही वेगाने पळाले. मी ओरडले, ‘अहो, घरात चोर घुसलेत...’ तेवढ्यात त्या दोघांनी जिन्याकडे धाव घेतली. माझ्या ओरडण्याच्या आवाजाने माझे पती, मुले, सुना, नातवंडे सगळे बाहेर आले. चोरट्यांनी धूम ठोकली. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशानेच आमच्या घराची निवड केली होती. कदाचित तेही नवखे असावेत, अन्यथा माझ्या कुटुंबाचे काही खरे नव्हते. काही विपरीत घडले असते तर...! या भीतीने तर नंतर हातापायाचे बळ गेल्यासारखे झाले.