आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव दूर करा अन् आनंदी राहा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आताच्या काळात प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे तणावाशी लढतो आहे. ज्यावेळी हा तणाव मनुष्यावर हावी होऊ लागतो यासाठी उपचाराची गरज भासते. बरेच लोक तणावाला मॅनेज करण्यासाठी औषधांचा आधार घेतात. परंतु औषधांऐवजी स्ट्रेस बॉलच्या मदतीने बऱ्याच अंशी तणाव कमी करू शकता.

असे करते काम - मज्जासंस्था चांगली ठेवण्यासाठी स्ट्रेस बॉल्स खूप सहायक ठरू शकतात. वस्तुत: आपले मनगट, हात आणि आसपासच्या भरपूर धमण्या थेट मेंदूशी जोडलेल्या असतात. तुम्ही स्ट्रेस बॉलवर दाब टाकता तेव्हा शरीरच्या धमण्या आणि स्नायू उत्तेजित होतात. तसेच त्या आकसत असल्याने बळकटही होतात.

चिंता होईल दूर - तुम्ही तुमच्या समस्येबाबत वारंवार विचार करता तेव्हा यामु‌ळे तुमचा तणाव वाढायला लागतो. अशा वेळी स्ट्रेस बॉल्स तुमची चिंता दूर करत एकाग्रता वाढवतो. यामुळे तुम्हाला ताजेतवाने करण्यामध्येही मदत होते.

इजा बरी होते - कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाल्यानंतर स्ट्रेस बॉल्सचा वापर करणे लाभदायक मानले जाते. स्ट्रेस बॉल्समुळे हातांना होणाऱ्या इजा बऱ्या करण्यामध्ये मदत मिळते. एवढेच नाही तर यामुळे तुमच्या हातांचा लवचिकपणा वाढण्यासही मदत मिळते.

व्यायाम होतो - स्ट्रेस बॉलमुळे मनगट आणि हातांच्या आसपासच्या स्नायूंचा व्यायाम तर होेतोच, परंतु यामुळे अनेक प्रकारची कसरतही होते. तथापि, शरीरातील धमण्या एकमेकांशी जोडलेल्या असतात. अशा वेळी स्ट्रेस बॉलमुळे शरीराच्या धमण्या उत्तेजित होतात आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.