आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Myth & Fact : पुरुषांना नसतात स्ट्रेच मार्क्स, जाणून घ्या यामागील सत्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्य लोकांचे म्हणणे आहे की, स्ट्रेच मार्क्स गरोदरपणानंतरच होतात. तथापि, हे चुकीचे आहे. जाणून घ्या स्ट्रेच मार्क्सशी संबंधित मिथक आणि सत्यता. 


मिथक : ज्या लोकांचे वजन कमी असते त्यांना स्ट्रेच मार्क्स नसतात. 
सत्य : स्ट्रेच मार्क्सचा संबंध लठ्ठपणाशी नाही. अनेकदा सडपातळ लोकांनाही ही समस्या होऊ शकते. स्ट्रेच मार्क्स हार्मोनल व आनुवंशिक कारणांमुळे होतो. काही आजारांमध्येही याची शक्यता अधिक असते. 


मिथक : स्ट्रेच मार्क्स फक्त महिलांनाच होतात. 
सत्य : स्ट्रेच मार्क्स केवळ महिलांनाच नाही, तर पुरुषांनाही होतात. अनेकदा पुरुषांच्या त्वचेमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे मार्क्स होतात. अचानक वजन वाढणे किंवा घटणे याचे मोठे कारण आहे. हेच पुरुषांमध्ये समानरीत्या दिसून येते. 


मिथक : आहाराचा प्रभाव स्ट्रेच मार्क्सवर नसतो. 
सत्य : आहाराचा प्रभाव त्वचा आणि स्ट्रेच मार्क्स दोघांना प्रभावित करतो. ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्स असलेला आहार स्ट्रेच मार्क्सचा परिणाम कमी करण्यास मदत करतो. तसेच जे लोक पाणी कमी पितात त्यांच्या शरीरात स्ट्रेच मार्क्स वाढू शकतात. तथापि, पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेवर स्ट्रेच मार्क्स कमी दिसायला लागतात.