आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोदावरी'च्या आवर्तनातून पाणीचोरी केल्यास फौजदारी, धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात, शेततळे, गावतळ्यांची तपासणी सुरू 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदावरी डावा व उजवा तट कालव्यांना रब्बीतील दुसरे सिंचन व बिगर सिंचनासाठी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, यंदा दुष्काळी स्थिती असल्याने पाणीचोरीची शक्यता लक्षात घेता दोन्ही कालव्यांवरील सर्वच शेततळे, साठवण बंधारे, गावतळ्यांची तपासणी, सर्वेक्षण पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे. त्यामध्ये पाणी साठविल्यास कठोर कारवाईचा इशारा नाशिक पाटबंधारे विभागाने दिला आहे. 

 

उन्हाळ्यात पिण्यासाठी आवश्यक पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच पाणीवापर संस्थांसाठी पाणी आरक्षणही करण्यात आले आहे. त्यानुसार आता ठरलेल्या आवर्तनांनुसार धरणांतून पाणी सोडले जात असून, गोदावरी कालव्यांचे रब्बीचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. दुष्काळी स्थिती पाहता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यात यावा. अनधिकृत डोंगळे, पाइप्स, विद्युत मोटारी, पाणी उचलण्याची इतर साधने काढून टाकण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्याशिवाय या कालव्यांच्या मार्गात येणारे शेततळे, गावतळे, साठवण तलावांची तपासणी पाटबंधारे विभाग करत आहे. त्यामुळे या तलावांत वाढीव पाणी कुठून आले, कसे आले याचे उत्तर संबंधितांना द्यावे लागणार आहे. कुठल्याही स्थितीत पाण्याचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळल्यास महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ व जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई कायदा २००५ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. शिवाय संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांनी अनधिकृतपणे पाणी साठविले असले त्यांनी स्वखर्चानेच हे पाणी पुन्हा कालव्यांद्वारे सोडून द्यावे, असे आवाहन पाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा. शा. शिंदे यांनी केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...