आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फुलराणी’ टाळण्यासाठी कडक कायदा हवा...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगणघाटमध्ये फुलराणीला भररस्त्यावर पेटवून दिले. या घटनेनंतर देशभर संताप उसळला. या भयावह वातावरणात वास्तवाला भिडताना...संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारे आले, काळीज थरथरले. मात्र संवेदनशील माणसांनी वास्तव स्वीकारत मौन सोडावे यासाठी “दिव्य मराठी’ने मौन सोडू, चला बोलू असे आवाहन केले होते. त्यास वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यातील कानाकोपऱ्यातून ई-मेल, व्हॉट‌्सअॅपच्या माध्यमातून याबाबतची मते वाचकांनी कळवली. त्यातील या काही निवडक प्रतिक्रिया...

कायदा-सुव्यवस्था लष्कराच्या ताब्यात द्या - यशवंत डोंबाळी, पंढरपूर


देशात कायद्याचा धाक उरला नाही, पळवाटांचे मार्गदर्शकही विकृतच झाले म्हणावे लागतील. निर्भयाला आपण आजही न्याय मिळवून देऊ शकलो नाही, याचीच लाज वाटते. नैतिकतेचे धडे शिकवणारे शिक्षकच विद्यार्थिनींवर अत्याचार करत असतील तर नैतिक मूल्ये मेलीत असेच म्हणावे लागेल. अत्याचाराच्या प्रकरणातील ६८ टक्के आरोपी मोकाट असतील तर कायद्याचे अपयशच म्हणावे लागेल. लोकप्रतिनिधीही यास जबाबदार आहेत. कायदा-सुव्यवस्था लष्कराच्या ताब्यात देण्याची वेळ आली आहे. अर्थात या परिस्थितीला आपणही जबाबदार आहोत, कारण आपल्यात तटस्थपणा तरी असतो नाही तर आपण बघ्याच्या भूमिकेत नाही तर मार्गदर्शक असतो. पळवाटा शोधण्यापूर्वीच शिक्षा व्हावी - गणेश रभाजी शिपणकर

अशा बाबींमध्ये मुलीच्या घरच्यांनी पोलिसात जायलाच पाहिजे. आजूबाजूच्या नागरिकांनी थोडी सतर्कता दाखवली तर कदाचित अशा घटना टळतील. कोणी पाठलाग करत असेल, त्रास देत असेल तर मुलींनी बिनधास्त घरी सांगितले पाहिजे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुलींनी जवळ शस्त्र बाळगावे. कायद्याच्या पळवाटा शोधण्याच्या अगोदर अशा राक्षसांना शिक्षा व्हायला हवी. मुलाचं वागणं-बोलणं बदललं असेल  तर वेळप्रसंगी मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. मौन सोडू चला बोलू अशी संकल्पना सुरू करण्यासाठी, आणि अशा घटना अत्यंत संवेदनशीलपणे जनतेसमोर आणण्यासाठी दैनिक दिव्य मराठीचे मनापासून आभार.  टीव्हीवरच्या मालिकांतून उत्तेजन - सुदर्शन कवडे, सातपूर, नाशिक


अशा घटना यापूर्वीही  घडल्या आहेत, यापुढेही घडतील, असे हताश होऊन म्हणावे  वाटते. याचे कारण  म्हणजे टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कौटुंबिक (?) मालिका. या खरेच कौटुंबिक आहेत का, याचा विचार करा. प्रत्येक मालिकेत विवाहबाह्य सबंध, दोन-तीन वेळेस लग्न, अनेकांशी  प्रेमप्रकरणे याशिवाय काय दाखवतात? यातून कोणता सामाजिक संदेश मिळतो? काय बोध घ्यायचा? कायद्याच्या पळवाटा शोधणे जोपर्यंत चालू आहे. तोवर नराधमांचे धैर्य वाढत जाणार आहे. शिक्षेऐवजी आपली व्यवस्था त्यांना फुकटचे पोसण्यात खर्च करते. कठोर कायदे करून गुन्हेगारांना लवकर शिक्षा होत नाही तोपर्यंत सगळे अवघड आहे. पदवीधर आमदारांनी राजीनामा द्यावा - राजेश वाघमारे , डोणगाव, ता.मेहकर,जि.बुलडाणा

या प्रकरणामुळे विदर्भाची मान शरमेने झुकली आहे. या  गंभीर प्रकरणात मला आतापर्यंत स्थानिक पदवीधर आमदार महोदयांचा सक्रिय सहभाग दिसत नाही. हे पदवीधर आमदार अशा वेळी जर या प्रकरणात जातीने लक्ष देत पीडितेला न्याय देऊ शकत नसतील तर स्थानिक आमदार महोदयांनी  राजीनामा द्यावा असे मला वाटते. जनतेतून निवडून गेलेले आमदार हे अडाणी जनतेला काहीही समजत नसल्याचा फायदा घेतात. परंतु हे तर सुशिक्षित मतदारांचा आणि त्यांच्या पदवीचा अपमान झाल्यासारखेच म्हणावे लागेल. पदवीधरांनी आता जागृत व्हावे. अशांना जागेवरच शिक्षा हवी...-मनोज रत्नपारखी, औरंगाबाद

अशा माथेफिरूला त्याच ठिकाणी त्याच पेट्रोलने पेटवून दिले पाहिजे. त्याचे हातपाय तोडून टाकले पाहिजेत. अशा क्रूरकर्म्यास जागेवरच शिक्षा हवी. सरकारनेही अशा कायद्यात लवकर सुधारणा करावी. कमी वेळेतच फाशी अथवा अवयव निकामी करणे या व इतर कठोर शिक्षा द्यावी.  नराधमांचे एन्काउंटर करा -अमृत शेटे, सोलापूर

अशा नराधमांना पोलिसांच्या हातात देऊन काही फायदा नाही, तरुण मुलांच्या हातात द्या. तुम्हाला पाहिजे ते उत्तर मिळेल. पोलिसांना सुपूर्द केले तर नंतर फाइल क्लोज होऊन जाते. त्यापेक्षा आमचा हातात द्या, त्या मुलीला जेवढ्या यातना झाल्या त्यापेक्षा  जास्त यातना आम्ही त्याला देऊ. त्याचे एन्काउंटर करा.वकीलपत्र घेणारेही दोषीच -गणेश घोडके

मला वाटते की कितीही कडक कायदे करा,  त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण त्यांना वाचवण्यासाठी व पैशासाठी काही वकील आहे जे कायद्याचा दुरुपयोग करतात, त्यामुळे जे अपराध्याला वाचवतात त्याच वकिलाला मारले / जाळले पाहिजे, म्हणजे त्यांना कोणी वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही.अशा नराधमांच्या फाशीचे थेट प्रक्षेपण व्हावे...- सुहास टिपरे, नाशिक

"दिव्य मराठी'ने पीडितेवरील शस्त्रक्रिया व अन्य उपचारासाठी  केलेली मदतीची भूमिका स्वागतार्ह आहे  त्याबद्दल अभिनंदन.   या प्रकरणातील अपराधी भारतीय कायद्यानुसार, निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांप्रमाणे, कायद्यातील पळवाटांनुसार आजही  जिवंत आहे, श्वास घेत आहे, त्या पळवाटा संपल्या पाहिजेत.  पळवाटांसाठी मदत करणाऱ्यांना बहिष्कृत केले पाहिजे. स्त्रीबाबत  असे गुन्हे करणाऱ्यांना स्वतंत्र कोर्ट स्थापन करून, किमान कालावधीत निर्णय देऊन  फाशीची अंमलबजावणी केली पाहिजे.  दहशत बसण्यासाठी नराधमांची फाशी लाइव्ह ठेवावी, म्हणजे  गैरप्रकार करण्याची हिंमत कोणी करणार नाही.समाजाने बघ्याची भूमिका न घेता कृती करावी - प्रतीक गावडे, जालना  

अशा घटना घडल्यावरच समाजाला जाग येते, पण तोपर्यंत एखादी स्त्री ह्या अन्यायाला बळी पडते. हे कितपत योग्य आहे, ह्याचा विचार सगळ्यांनी करून त्यावर काहीतरी कृती करावी, जेणेकरून येणारी पिढी आपल्याला दोष देणार नाही. देशात सध्या २० मिनिटाला एक महिला अत्याचाराला बळी पडते. काही प्रकरणांत तर बदनामीच्या भीतीने अनेकदा तक्रारही कुणी करत नाही. हिंगणघाट येथे जे काही घडले ते घृणास्पद आहे. त्या नराधमाला कठोर शिक्षा त्या त्यादृष्टीने कायदादेखील व्हावा. असे प्रकार घडत असताना समाजाने नुसती बघण्याची भूमिका न घेता त्यावर कृती करावी.  स्वतः पुढाकार घेऊन माणुसकी दाखवावी. १५ दिवसांत फाशी द्यावी -डॉ.नितीन काकडे, धुळे

बाळा, तू चांगली होशील अशीच प्रार्थना आम्ही करतो आहोत... त्या नराधमाची केस पंधरा दिवसांत निकाली काढून त्यास मरेपर्यंत "फाशी' हीच शिक्षा सुनवावी. त्यास कोठेही अपील करता येणार नाही असे आदेश द्यावेत. निर्भयाचे आरोपी कोर्टाला कसे खेळवताहेत हे आपण पाहतच आहोत. निर्णय ताबडतोब लावावा. हीच शासनाला व कोर्टाला विनंती.

कायद्यावरचा विश्वास उडाला - अक्षय सावंत
 
जोपर्यंत हैदराबादसारख्या एन्काउंटरला सरकारचा आणि सरकारी यंत्रणेचा सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत हे असले प्रकार कमी होणार नाहीत हे तितकेच खरे. एक फेब्रुवारीनंतर आता गुन्हेगाराचा आणि सामान्य जनतेच्या कोर्टावर, कायद्यावर विश्वास राहिला नसेल हे पण तितकेच खरे.  ... मुली खेळणे आहेत काय? -अविनाश जाधव, फलटण, जि. सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला बहीण आणि माता मानले आणि आज महाराष्ट्रात असे वाईट कृत्ये घडते ही खुप लाजिरवाणी बाब आहे. मुलींना आईच्या गर्भात मारण्याची, नाहीतर एकतर्फी प्रेमाला नकार दिला तर जाळून मारण्याची भीती  स्त्रीकडे  वस्तू म्ङणून पाहिले जात आहे. ही मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. सामाजिक स्तरावर संवेदनशील मनाने सामूहिक प्रयत्न होणे आ‌वश्यक  - बाळासाहेब जोगदंड ,औरंगाबा


प्रेमाचा खरा अर्थ आपल्या जोडीदाराच्या सुखात सुख मानणं असतो हे आजच्या या प्रेमवीरांना का समजत नाही? हा प्रश्न आहे.  नाजूक प्रेमाची परिणती अशा हिडीस प्रकरणात होते. ही खलनायकी परंपरा कुठवर चालणार? यासाठी सामाजिक स्तरावर संवेदनशील मनाने सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
 कायद्याची पुस्तके बाजूला सारून नराधमाला शिक्षा करावी - मनोज पवार


कायद्याचा धाक राहिलेला नाही. माझी बहीण, मुलगी सुरक्षित असावी असे वाटत असेल तर कायद्याची पुस्तकं बाजूला करावी लागतील. आणि अशा क्रूर कृत्याला स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्या काळात  दिलेली शिक्षाच देणे आता योग्य ठरेल आणि तीसुद्धा समाजासमोर.
 निर्भया प्रकरणात शिक्षा झाली असती तर आज हे घडले नसते... - विजया सोळंके, एमजीएम महाविद्यालय


सात-आठ वर्षांपूर्वी आपल्या भारतात निर्भया प्रकरण  घडले, तेव्हापासून या घटना वाढत आहेत. जर आपल्या सरकारने, कायद्याने निर्भया प्रकरणातील आरोपींना सात वर्षांच्या आत सुनावणी करून फाशी दिली असती, तर त्यानंतर असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत कधीच झालीच नसती. 
 

बातम्या आणखी आहेत...