आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stricter Rules Leads To Rejection Of Scholl, Free School Is The Solution, Problems Due To Rigid Rules Of 70 80 Era In Japan

कठोर नियमांमुळे शाळेस नकार, मुक्त शाळा तोडगा, जपानमध्ये 70-80 च्या दशकातील नियमांचा त्रास

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
टोकियोतील एका मुक्त शाळेत पाळीव कुत्र्यासोबत विद्यार्थी. - Divya Marathi
टोकियोतील एका मुक्त शाळेत पाळीव कुत्र्यासोबत विद्यार्थी.

टोकियो : टोकियोत राहणारा दहा वर्षीय युटा इटोला शाळेत जाण्याची इच्छा नाही. त्याचे वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी नेहमी भांडण होत असते. युटाच्या या निर्णयानंतर त्याच्या आई-वडिलांजवळ तीन पर्याय होते. युटाला शाळेतील समुपदेशन कक्षात नेणे. त्यांना गृहशिक्षण देणे. किंवा त्याला मुक्त शाळेत पाठवणे. त्यांनी शेवटचा पर्याय निवडला. मुक्त शाळेत गेल्यापासून युटा अतिशय आनंदी आहे. आता तो त्याला हवे ते करू शकतो.

परंतु, ही समस्या फक्त युटाची नसून जपानमध्ये याकाळात अनेक मुले या स्थितीतून जात आहेत. जपानमध्ये अशा मुलांना फुटोको असे म्हटले जाते. जे भीतीमुळे शाळेत जाण्यास नकार देतात. जपानच्या शिक्षण मंत्रालयानुसार जी मुले आरोग्य किंवा आर्थिक समस्यांमुळे ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत जात नाहीत, त्यांना फुटोको म्हणतात. या शब्दाचा अनेक प्रकारे अर्थ लावण्यात येतो. जसे की, अनुपस्थिती, स्कूल फोबिया किंवा शाळेत जाण्यास नकार देणे. फुटोकोच्या वृत्तीत गेल्या काही दशकांमध्ये बराच बदल झाला आहे. १९९२ पर्यंत शाळेत जाण्यास नकार देणाऱ्यांना टोकोक्योशी म्हटले जात होते. ज्याचा अर्थ प्रतिकार असा होता. याला मानसिक आजार समजले जात होते. परंतु, १९९७ मध्ये शब्दावली बदलली आणि याचा अर्थ फुटोतो झाला. ज्याचा अर्थ अनुपस्थिती असा आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गैरहजेरी विक्रमी पातळीवर नोंदवली गेली. यामध्ये २०१७ मध्ये १.४४ लाख मुले, तर २०१८ दरम्यान ३० पेक्षा जास्त दिवस १.६४ लाख मुले गैरहजर होती. शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार कौटुंबिक स्थित, मित्रांसोबतचे मतभेद, घाबरवणे-धमकवणे यामागील मोठे कारण आहे. शाळा सोडलेल्या काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे व इतर विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळाले नाही. ७०,८० च्या दशकामध्ये हिंसा ,खोडकरपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शाळांनी कठोर नियम लागू केले आहेत. त्यांना ब्लॅक स्कूल रुल असे म्हटले जाते. जपानमधील अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बाबींवर नियंत्रण ठेवतात. विद्यार्थ्यांना भुरकट केस काळे करणे अनिवार्य आहे. थंडीत कोट घालू देत नाहीत. काही प्रकरणांत विद्यार्थ्यांच्या इनरविअरच्या रंगांबाबतही निर्णय घेतात.

लोकांचा आरोप : विद्यार्थ्यांना शाळांत रस नाही, यंत्रणेचे अपयश

विद्यार्थी शाळांपासून दुरावणे, हे यंत्रणेचे मोठे अपयश असल्याचे लोक म्हणतात. फुटोकोच्या वाढत्या प्रकरणांना लक्षात घेता देशात ८० च्या दशकात मुक्त शाळा सुरू झाल्या. मुक्त शाळांचे वातावरण अनौपचारिक असते. येथे मुले कुटुंबासारखे राहतात. एका मुक्त शाळेचे प्रमुख ताकाशी म्हणाले, या शाळांचा उद्देश सामाजिक कौशल्य विकसित करणे आहे. १९९२ मध्ये ७,४२४ मुले पर्यायी शाळांत होते. २०१७ मध्ये ही संख्या २०,३४६ वर गेली.

बातम्या आणखी आहेत...