Home | National | Other State | Strike between two passengers For a seat on the train

रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशाला खाली खेचुन महिलांनी केली मारहाण, छठ पूजेकरता घरी जाण्यासाठी प्रचंड गर्दी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 04:02 PM IST

रेल्वे प्रशासनातर्फे कोणीही वाद मिटवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

  • कटिहार (बिहार) - छठ पूजेसाठी घरी जाण्यासाठी बरेच जण बस आणि रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, कटिहार रेल्वे स्टेशनवर मारहाणीची घटना समोर आले आहे. दोन प्रवाशांची रेल्वेत चढण्यासाठी एकमेकांत जुंपल्याने हा वाद निर्माण झाला.

    शुक्रवारी कटिहार ते मनिहारी रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची एकच चढाओढ सुरू होती. गाडी पूर्आण भरलेली होती. त्याचवेळी एका प्रवाशाने रेल्वेत चढण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यासोबत इतर प्रवाशांनीदेखिल मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये महिलांनीही मारहाण केली. रेल्वे प्रशासनातर्फे कोणीही वाद मिटवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

  • Strike between two passengers For a seat on the train
  • Strike between two passengers For a seat on the train

Trending